आपल्या अजरामर स्वरांनी सर्वांना मंत्रमुग्ध करणाऱ्या लतादीदींच्या जाण्याने संगीत क्षेत्रातील ध्रुव निखळला अशा शब्दात आचरा व्यापारी संघटनेचे जेष्ठ व्यापारी आणि रामेश्वर सार्वजनिक वाचनमंदिराचे अध्यक्ष श्रीकांत सांबारी यांनी लतादीदींना श्रद्धांजली अर्पिली. स्वरसम्राज्ञी लतामंगेशकर यांना सोमवारी सकाळी आचरा व्यापारी संघटनेच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी लतादीदींच्या आठवणींना सांबारी यांनी उजाळा दिला.
यावेळी त्यांच्या सोबत आदर्श व्यापारी संघटना आचराचे अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर,उपसरपंच पांडूरंग वायंगणकर,अशोक कांबळी, संघटनेचे जयप्रकाश परुळेकर,मंदार सांबारी,वामन आचरेकर, पंकज आचरेकर,हेमंत गोवेकर, संदिप पांगम,उदय घाडी,महेश शेटये,गजानन गांवकर, उज्वल कोदे,रविंद्र बागवे,गणेश सावंत,किरण ढेकणे, विजय लाड,नरेंद्र कोदे यांसह अन्य व्यापारी आदी उपस्थित होते. यावेळी उपाध्यक्ष मंदार सांबारी यांनी सातही स्वर होते जिच्या वरती लुब्ध ,स्वरांचा साज देवूनी जगाला लतादीदी निघाली परतीच्या प्रवासाला अशा स्वरचीत काव्यातून लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, जेष्ठ नागरीक संघाचे अशोक कांबळी यांनी ही लतादीदींच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण केली.