You are currently viewing शब्दशिल्प कलाविष्कार संघ साहित्यिक समूहात मनोरंजनातून प्रबोधन करणारा तिळगूळ समारंभ, साहित्यिक वाण देऊन उत्साहात संपन्न.

शब्दशिल्प कलाविष्कार संघ साहित्यिक समूहात मनोरंजनातून प्रबोधन करणारा तिळगूळ समारंभ, साहित्यिक वाण देऊन उत्साहात संपन्न.

शब्दशिल्प कलाविष्कार नोंदणीकृत समूहात संक्रांत निमित्ताने तिळगूळ व हळदीकुंकू समारंभ दि. ५ फेब्रुवारी २०२२ रोजी सायंकाळी सात वाजता ऑनलाईन स्वरूपात आयोजन करण्यात आले होते. समारंभाची आकर्षक अशी निमंत्रण पत्रिका चि. सौरभ आहेर यांनी बनविली. कवी मयूर पालकर यांचे ओघवत्या शब्दशैलीतील निवेदन श्रोत्यांना खिळवून ठेवणारे होते. आयोजन समितीने तिळगूळ समारंभासाठी स्वागत करण्याचे, संक्रांत माहितीचे, हळदीकुंकू लावण्याचे, तिळगूळ वाटपाचे कल्पकतेने भिन्न चित्रफित बनविले होते. साहित्यिक वाण म्हणून चंदनाक्षरी काव्यप्रकाराच्या कवितांचे ई बुक चंदनाक्षरी निर्मितीकार चंदन तरवडे यांनी बनविले आणि तिळगूळ समारंभात हे साहित्यिक वाण समूहातील सर्व सदस्यांना देण्यात आले. समूहात असणाऱ्या विधवा स्रियांना मान्यवर म्हणून आमंत्रित करून आयोजकांनी त्यांना हळदीकुंकू व वाण उखाणा घेऊन दिले. श्रीमती सुशीला पिंपरीकर, रजनी येवले, सरला सोनजे, सुरेखा बामणकर, अलका पितृभक्त, विमल बागडे, रोहिणी येवले आमंत्रित मान्यवर होत्या. शब्दशिल्पच्या अध्यक्षा सौ.अलका येवले यांनी मनोगतात सांगितले की हे मनोरंजनातून समाज प्रबोधनाचे छान निमित्त आहे. बदल घडावा असे आपणास वाटत असेल तर तो आपण करावा आणि सुरुवात स्वत:पासून करावी आणि मग इतरांनाही सांगावी ,असे कार्याध्यक्षा सौ.गीतांजली वाणी यांनी सांगितले. आकर्षक मांडणी असणारे ई बुक देवी शैलपुत्री ह्या नावाने प्रकाशित करण्यात आले. समारंभाच्या यशस्वितेसाठी आयोजक सौ. सपना भामरे, सौ. भाग्यश्री बागड, सौ. योगिता तकतराव, सौ. मिनल बधान, सौ. अर्चना नावरकर, सौ.आशा अमृतकर यांनी मोलाचे सहकार्य केले. सौ शशीकला वाणी, सौ सुनंदा सोनजे, ज्येष्ठ नागरीक, समारंभात उत्साहाने उखाणा चित्रफीत पाठवून आनंद साजरा केला. सौ उषा देव, सौ रंजना बोरा यांनी काव्य स्वरूपात कार्यक्रमाला उत्सफूर्त अभिप्रायही दिला. सर्व मान्यवरांचे आभासी सन्मान करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा