आजी माजी सैनिक संघटना माणगाव खोरे तर्फे भारताचा प्रजासत्ताक दिन सैनिक पतसंस्था माणगाव च्या टेरेसवर सालाबाद प्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात करण्यात साजरा करण्यात आला. शिवापूर, वसोली, उपवडे, गोठोस, वाडोस, कालेली या दुर्गम भागातून सैनिक सकाळी दहा वाजेपर्यंत माणगावी स्नेह मेळाव्यासाठी हजर झाले. वाढलेल्या थंडीची पर्वा न करता आणि एसटी बसची व्यवस्था नसतानाही देशप्रेमाने भारावून भारताचा प्रजासत्ताक दिन चिरायु होवो या उद्देशाने एकत्र आले. प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त झालेले ऑनरेबल लेफ्टिनेंट श्री राजेश अनंत नाईक (राहणार उपवडे माणगाव) आणि साळगावचे सेवानिवृत्त अपग्रेडेड प्राथमिक मुख्याध्यापक एल.एस. धुरी हे उपस्थित होते.
सैनिक पतसंस्थेचे चेअरमन आणि संघटना अध्यक्ष सुभेदार मेजर शिवराम गणेश जोशी यांनी पाहुण्यांचे आणि उपस्थितांचे मनःपूर्वक स्वागत केले. देशसेवा करताना हौतात्म्य मिळालेल्यांना मिळालेल्याना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली.
सुबेदार मेजर चंद्रकांत खोचरे यांनी गेल्या वर्षीच्या कार्यक्रमांची माहिती दिली आणि हिशोब वाचन केले. प्रमुख पाहुणे राजेंद्र अनंत नाईक यांचे शाल श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन जोशी यांनी सत्कार केला. कॅप्टन कृष्णा परब यांनी एल.एस.धुरी यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. सुबेदार दत्ताराम धुरी यांनी इतर आजी माजी सैनिकांचा व महिलांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार केला. दहावी व बारावी प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.
वयाची ऐंशी वर्षे पूर्ण झालेले शिवराम गणेश जोशी यांचा पाहुण्यांच्या उपस्थितीत कॅप्टन मधुकर वारंग व सुभेदार अनंत मासंग यांच्या करकमलमाद्वारे शाल-श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. सन 1971 च्या भारत-पाक युद्धातील सहभागी सैनिकांना चंद्रशेखर जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पाहुण्यांचे हस्ते शाल, सन्मानचिन्ह व गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला. त्यात प्रामुख्याने सुबेदार अनंत मासंग, मधुकर परब, मारुती गुंजाळ, अशोक केरवडेकर, हवालदार मार्गी इत्यादी माजी सैनिक उपस्थित होते.
सैनिक पतसंस्थेचे माणगाव शाखा व्यवस्थापक राजन बाळकृष्ण राऊळ यांचा चेअरमन जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. माणगाव पतसंस्थेची आर्थिक प्रगती बाबत बोलताना राऊळ यांनी संस्थेच्या उलाढालीवर प्रकाश केंद्रित केला. व्यवस्थापनाचे चांगले सहकार्य मिळाल्याचे नमूद केले. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतात संघटनेच्या कार्याची प्रशंसा केली. सर्व सैनिकांनी एकत्र येऊन देशसेवेसाठी योगदान दिलेल्या त्यांचा गौरव करावा व आपले संघटन कौशल्य दाखवावे यापुढे आपणही सैनिक संघटना वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहू.
श्री एल.एस. धुरी गुरुजी संघटनेच्या सहकार्याबद्दल भारावून गेले. आपल्याला सैनिकांचा पहिल्यापासूनच आदर आहे. आपले नातेवाईक हे माजी सैनिक असून त्यांच्या कामगिरीचा अभिमान असल्याचे नमूद केले. साळगाव रणस्तंभाबाबत आपण कृतज्ञ असून शहीद झालेल्या सैनिकांची नावे आपण मंत्रालयातून मिळविली आहेत. पहिल्या महायुद्धात साळगावचे सहा सैनिक विरगती प्राप्त झाले होते.
अध्यक्ष श्री जोशी यांनी आपल्या मनोगतात
One Rank One Pensio (वन रँक वन पेंशन) बाबत माहिती दिली. तरुण माजी सैनिकांची संघटनेसाठी प्रयत्नशील रहावे व संघटनेचे आजी-माजी सैनिकांच्या कार्यासाठी सर्व तऱ्हेने मदत करावी. या कार्यालयात माणगाव खोऱ्यातील माजी सैनिक व त्यांचा परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रथमच कार्यक्रमाला आलेल्या माजी सैनिकांनी आपला परिचय करून दिला व आपण संघटनेसाठी एकत्र येऊ. कार्यक्रमाच्या शेवटी हवालदार अमोल मासंग यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले. चंद्रशेखर जोशी यांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडली. त्यानंतर प्रीती भोजनाचा कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला.