You are currently viewing काँग्रेसकडून होणार डिजीटल सभासद नोंदणी

काँग्रेसकडून होणार डिजीटल सभासद नोंदणी

मालवणात कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण शिबीर संपन्न

मालवण :

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सूचनेनुसार जिल्हा काँग्रेसच्या माध्यमातून मालवण तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार यांची ऑनलाइन डिजिटल सभासद नोंदणी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मालवण तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले.

जिल्हा काँग्रेसने नेमलेले डिजिटल सभासद नोंदणीचे प्रमुख समीर वंजारी हे यावेळी उपस्थित होते. श्री. वंजारी यांनी डिजिटल सभासद नोंदणीसाठी मार्गदर्शन केले. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ चव्हाण, तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी, अरविंद मोंडकर, श्रीकृष्ण तळवडेकर, बाळू अंधारी, देवानंद लुडबे, संदेश कोयंडे, महेंद्र मांजरेकर, हेमंत माळकर, गणेश पाडगावकर, योगेश्वर कुर्ले, पल्लवी तारी, श्रीहरी खवणेकर, महिला अध्यक्षा ममता तळगावकर, हेमंत कांदळकर, श्री. मेस्त्री आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा