You are currently viewing वेंगुर्ले कॅम्प येथील दहा महिलांना मोफत शिलाई मशीनचे वाटप

वेंगुर्ले कॅम्प येथील दहा महिलांना मोफत शिलाई मशीनचे वाटप

स्वयंरोजगाराची दिशा : जनशिक्षण संस्थेचा उपक्रम

वेंगुर्ले

भाजपचे नेते माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत असलेल्या विविध संस्थां मधील जनशिक्षण संस्थेमार्फत वेंगुर्ले कॅम्प कॉलनी येथील दहा महिलांना माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या उपस्थितीत शिलाई मशीनचे वाटप आणि व्यावसायिक मार्गदर्शन करण्यात आले.


कॅम्प कॉलनी येथे हा शिलाई मशीन वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जन शिक्षण संस्था परिवर्तन केंद्र जिल्हा समन्वयक विलास हडकर, वेंगुर्ले चे माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, भाजपा तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, तालुका उपाध्यक्ष बाबली वायंगणकर, बाळा सावंत, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष प्रणव वायंगणकर, राजन लाड, नितीन चव्हाण तसेच लाभार्थी महिला रोशनी वायंगणकर, समीक्षा परब, रूपा वेंगुर्लेकर, दया परब, प्रियांका कोयंडे, मंगल बुरुड, सोनाली जगताप, रश्मी गावडे, सुहानी परब, रिया गिरप आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना श्री हडकर म्हणाले की, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यात महिलांना शिलाई मशीन चे मोफत वाटप करून क्लस्टर उभे करण्याचे काम सुरू आहे. त्याच बरोबर शाळकरी मुलींना सायकलचे वाटप, महिला, युवक अशा सर्वांना वेगवेगळे प्रशिक्षण संस्थांच्या मार्फत देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभ करण्यासाठी सुरेश प्रभू यांचे प्रयत्न सुरू आहेत. वेंगुर्ले शहरात या १० शिलाई मशीन एका गटाला दिल्या आहेत. गटातील महिलांनी प्रामाणिकपणे या मशीनचा वापर स्वतःच्या व्यवसायासाठी करावा, आणि विश्वास संपादन करावा. जेणेकरून संस्थेमार्फत पुढील सहकार्यही अजून चांगल्या पद्धतीने करता येईल असे त्यांनी सांगितले. तसेच भाजपच्या माध्यमातून काम करणाऱ्या लोकांना एकत्र घेऊन काम करूया व आपली प्रगती साधूया असे आवाहन त्यांनी केले. यावेळी माजी नगराध्यक्ष गिरप यांनीही मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रसंना देसाई यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार बाबली वायंगणकर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा