You are currently viewing राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे सावंतवाडी पोलीस निरीक्षकाना निवेदन

राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे सावंतवाडी पोलीस निरीक्षकाना निवेदन

वारकरी संप्रदायाचे बंड्यातात्या कराडकर यांच्यावर, संसदरत्न सुप्रियाताई सुळे व पंकजाताई मुंडे यांच्या संदर्भात बदनामीकारक वक्तव्य केल्याबद्दल फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत आज राष्ट्रवादी युवती काँग्रेस, सिंधुदुर्ग च्या वतीने पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
बंडा तात्या यांनी केलेले हे वक्तव्य अतिशय निंदनीय असून संपूर्ण महाराष्ट्रतील महिलांचा हा अपमान आहे.
यांच्याबद्दल जे वादग्रस्त वक्तव्य केल आहे, ते अत्यंत संतापजनक आहे. त्यांच्या या वक्त्व्यामुळे महिलांच्या आत्मसन्मानाला व प्रतिष्ठेला धक्का पोचलेला आहे. हा अवमान फक्त या दोन व्यक्तींचा नसून महाराष्ट्रातील तमाम युवतीं माता भगिनींचा आहे. या महाराष्ट्राला अनेक महिलांचा वारसा लाभला आहे हे वेगळं सांगायची गरज नाही.अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या कीर्तन करांवर तात्काळ बंदी आणावी व महाराष्ट्राच्या संस्कृतीचा विनाश थांबवावा. याची गंभीर दखल घेऊन या वक्तव्याबाबत बंडा तात्या कराडकर यांच्यावर कडक कारवाई करुन अशा या महाराष्ट्राला लागलेल्या बांडगुळाला जाळून टाकावे.
निवेदन दिले. यावेळी राष्ट्रीवादी युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर, युवती जिल्हा उपाध्यक्ष सिद्धी कांबळे, सावंतवाडी तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी सावंतवाडी शहराध्यक्ष देवेंद्र टेंबकर, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष ईफतीकार राजगुरू सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष संतोष जोईल आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा