You are currently viewing ॥श्री॥

॥श्री॥

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या राष्ट्रीय पुरस्कारित ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार यांची भक्तीपूर्ण काव्यरचना

किती रूप मनोहर डोळा भरले गणेश
अग्रपुजेचा हो मान आहे पहा सर्वाधिश
राजा गणांचा म्हणून नाव असे गणपती
देतो सर्वांना सद् बुद्धी आणि जीवनाला गती …

शिवपार्वतीचा लेक बुद्धिदाता विद्यादाता
ज्ञानवंत गुणवंत आहे जगाचा विधाता
मन होतसे प्रसन्न दिसताच गणराज
त्यास शोभे पितांबर माथा मुकुट नि साज …

वाल्मिकींचे रामायण घेई लिहून गणेश
वक्रतुंड महाकाय लंबोदर गणाधिश
शूर्पकर्ण आश्वासक आशीर्वादाचा तो हात
आराधना करताच संकटेच पळतात …

आहे देखणा सुंदर रूप किती मनोहर
भाद्रपद चतुर्थिला येतो पहा घरोघर
बारा महिने पुजतो मनमनात वसतो
मिष्किल त्या डोळ्यांनी हो किती सुंदर हासतो…

त्याला पाहताच पहा दु:ख्खे आधीच हारती
किणकिणतात घंटा घरोघर ती आरती
सुखकर्ता दु:ख्खहर्ता नामाभिधान सुंदर
ठाई ठाई त्याचे घर आणि हृदय मंदिर …

माघी गणेश पुजती आहे पहा मान मोठा
शिवयोग रवियोग जन्मतिथी पुण्यसाठा
मनोभावे पुजताच मोक्ष मिळे म्हणतात
लाडका हो भक्तांचा तो मनातच ठेवतात …

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : ४ फेब्रुवारी २०२२
वेळ : रात्री १२: ०२

प्रतिक्रिया व्यक्त करा