You are currently viewing तळेरे हायस्कूलचे साहाय्यक शिक्षक रमेश कांबळे सेवानिवृत्त

तळेरे हायस्कूलचे साहाय्यक शिक्षक रमेश कांबळे सेवानिवृत्त

वामनराव महाडीक हायस्कूल चे सहाय्यक शिक्षक रमेश कांबळे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त

वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला , वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय तळेरे मधील सहायक शिक्षक रमेश पंडित कांबळे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. याप्रसंगी रमेश कांबळे यांना तळेरे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ , मुंबई ,व शाळा समितीच्या वतीने शाल श्रीफळ सन्मानपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले .

यावेळी शाळा समिती सदस्य प्रविण वरूणकर, शरद वायंगणकर, निलेश सोरप, संतोष जठार , संतोष तळेकर,मुख्याध्यापक एस.जी नलगे , तळेरे गावचे उपसरपंच दिनेश मुद्रस , ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल वनकर , ए.एस. मांजरेकर , सी.व्हि. काटे , डी. सी . तळेकर , एन. बी.तडवी , ए. बी. कानकेकर , पी.एम. पाटील , व्हि. डी. टाकळे , कोकरे ,एन. गावठे, व्ही .केसरकर ,आर. तांबे , प्रकाश घाडी , देवेंद्र तळेकर आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तळेरे ग्रामस्थ शैलेश सुर्वे, जठार उपस्थित होते .

ग्रामपंचायत सदस्य वनकर म्हणाले कांबळे सर मितभाषी , प्रेमळ स्वभावामुळे विद्यार्थी वर्गात व सर्व शिक्षक सहकार्‍यांमध्ये प्रिय आहेत . एस. जी .नलगे म्हणाले १९८५ मध्ये शिक्षक म्हणून रूजू झाल्यानंतर कांबळे यांनी विद्यालयातील वसतीगृहाचे रेक्टर म्हणून काम पाहिले . त्या काळाच्या अतिशय खडतर, विपरीत परिस्थितीत अतिशय चोखपणे वसतिगृहाचे कामकाज त्यांनी सांभाळले तसेच शालेय पोषण आहार कामकाज देखील त्यांनी उत्तमरित्या पार पाडले . स्काऊट गाईड विभागामार्फत विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मनात सुसंस्कृत नागरिकत्व, जाज्वल्य देशाभिमान निर्माण करण्याचे कार्य स्काऊट मास्टर या नात्याने त्यानी आजतागायत केले असल्याचे सी.व्ही. काटे म्हणाले .अध्यापन अत्यंत प्रभावीपणे, मनोरंजक पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे त्यांचे कसब वाखाणण्याजोगे असल्याचे अविनाश मांजरेकर म्हणाले . यावेळी विराज नांदलस्कर , स्नेहल तळेकर या विद्यार्थ्यांनींही आपले मनोगत व्यक्त केले.
विद्यालयातील ३६ वर्षे ६ महिन्याच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत असलेल्या रमेश कांबळे यांना संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण खटावकर व कार्यकारी मंडळामार्फत भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडूनही शाल श्रीफळ भेटवस्तू देऊन उत्तम आरोग्यासाठी कांबळे सरांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए.बी.कानकेकर तर आभार व्ही.व्ही .केसरकर यानी मानले

प्रतिक्रिया व्यक्त करा