माजी आमदार तथा भारतीय जनता पार्टी भटके-विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नरेंद्र पवार व प्रदेश कार्यकारणी यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले जिल्हाधिकारी के.मंजू लक्ष्मी यांना निवेदन.
सिंधुदुर्गनगरी
ओबीसी राजकीय आरक्षण विषय मार्गी लागे पर्यंत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत सार्वत्रिक निवणुक कार्यक्रम जाहीर करू नयेत…जाहीर केल्यास भारतीय जनता पार्टी भटके-विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने लोकशाही मार्गाचा अवलंब करणार असल्याचा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे यांनी राज्य सरकारला देला आहे. हे निवेदन भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार तथा भारतीय जनता पार्टी भटके-विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नरेंद्र पवार व प्रदेश कार्यकारणी यांच्या सहीने व प्रमुख उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजु लक्ष्मी मॅडम यांच्या कडे सुपुर्द करण्यात आले.
सदर निवेदनात असे म्हटले आहे की,ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झालेमुळे बहुसंख्येने असलेल्या ओबीसी समाजाचे राजकीय नुकसान झाले आहे व ओबीसी समाजावर अन्याय झाला आहे.ओबीसी समाज मध्ये भटके विमुक्त आघाडीचा समावेश आहे.ओबीसी आरक्षण लागू होणे करता राज्य सरकार व ओबीसी राज्य आयोग यांनी ओबीसी राजकीय आरक्षण पुन्हा लागू होईल यासाठी वेगाने व सकारात्मक पाऊल उचलावीत. राज्यातील बहुसंख्येने असलेल्या ओबीसी समाजाचे राजकीय नुकसान झाले आहे त्यामुळे ओबीसी राजकीय आरक्षण लागू होतं नाही तो पर्यंत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत सार्वत्रिक निवणुक कार्यक्रम जाहीर करण्यात येऊ नये.ओबीसी राजकीय आरक्षण लागू होन्या आधी निवणुक कार्यक्रम जाहीर झाला तर ओबीसी समाजात आक्रोश निर्माण होईल व आम्ही भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी सिंधुदूर्ग जिल्हा यांच्यावतीने लोकशाही मार्गचा अवलंब करू यांची नोंद घ्यावी असा इशाराच जिल्हा अध्यक्ष श्री. नवलराज काळे यांनी राज्य सरकार ला दिला आहे.यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असेल असेही नमूद केले आहे.
निवेदन देतेवेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा माजी आमदार नरेंद्र पवार,प्रदेश सरचिटणीस अशोक चोरमुले,कोकण प्रभारी गोविंद गुंजळकर,महिला प्रदेश अध्यक्षा उज्ज्वला ताई हाके,धनगर समाज भाजप प्रदेश अध्यक्ष ॲड.मिलिंद जाडकर,कोकण विभाग अध्यक्ष श्रीराम इधाते, कोकण सहसंयोजक भास्करराव यमगर ,सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे, प्रदेश सरचिटणीस सुहासिनी केकाने,युवा प्रदेश अध्यक्ष अमोल गायकवड प्रदेश युवती अध्यक्षा ॲड.भाग्यश्री ढाकणे,युवा प्रदेश सचिव देवकाते, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी ॲड.पूजा जाधव, सिंधुदुर्ग जिल्हा धनगर समाज अध्यक्ष दीपक खरात, आंबोली मंडळ अध्यक्ष भरत गोरे, व इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.