संतोष परब हल्लाप्रकरणी दोन दिवस पोलीस कोठडी नंतर नितेश राणे यांना कोर्टात हजर करण्यात आले आहे. त्यांच्यासोबत त्यांचे खासगी सचिव राकेश परब यांनाही हजर करण्यात आले. या दोघांनाही कणकवली न्यायालयाने 18 फेब्रुवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
सरकारी पक्षाकडून नितेश राणे यांच्या वाढीव पोलीस कोठडीची मागणी केली जात होती. नितेश राणे यांनी फिर्यादी संतोष परब यांचा फोटो सचिन सातपुतेला आपल्या मोबाईल वरून पाठवला पण आरोपी नितेश राणे नाही म्हणणं आहेत त्यामुळे अजून 2 दिवसांची पोलीस कस्टडी पाहिजे आहे. असे सरकारी वकील यांनी न्यायालयाला संगीतले होते.
सहकारी पक्षांच्या वतीने ज्येष्ठ वकील प्रदीप घरत यांनी युक्तिवाद केला.
तर नितेश राणे यांचे वकील सतीश मानेशिंदे यांनी आपल्या युक्तिवादात म्हटले आहे की, दोन दिवस पोलीस कोठडी दिली होती, त्यात काहीच तपास झाला नाही. आम्ही सहकार्य केलं होतं.आता पोलीस कोठडीची गरज नाही.
न्यायालयात आजच जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. या अर्जावर नेमकी सुनावणी कधी होते आणि या दोघांचीही जामीनावर कधी मुक्तता होते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.