You are currently viewing सुपरमार्केटात आलिया दारू

सुपरमार्केटात आलिया दारू

लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्य कवी लेखक सत्तू भांडेकर यांची काव्यरचना

सुपरमार्केटात आलिया दारू
अहो चला मिळुनी दोन घुट मारू

चला चला की हो आवरा राया
आता पडायचं का तुमच्या पाया
थोडं तिथंही धिंगाणा घालू
अहो चला मिळुनी दोन घुट मारू

चकना घेऊ नि चिकन खाऊ
देशी विदेशी कॉकटेल पिऊ
अर्धीतच हो राया गर्दी थोडी करू
अहो चला मिळुनी दोन घुट मारू

पावलं टाकूया वाकडे तिकडे
घालूया चला बाटलीला साकडे
मी लाडाची नाहीका तुमची पारू
अहो चला मिळुनी दोन घुट मारू

भट्टीत जाता नि एकटेच ढोसता
गल्लोगल्लीत राया कितिहो लोळता
आता सुपरमार्केटात चकरा घालू
अहो चला मिळुनी दोन घुट मारू

सत्तू भांडेकर, गडचिरोली
मो. न. ९७६७३१९४७२

प्रतिक्रिया व्यक्त करा