सावंतवाडी तालुक्यातील साटेली येथे युवतीला दांड्याने मारहाण करत तिला जीवे मारण्याची धमकी या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर गंगाराम सावंत असे संशयिताचे नाव आहे. ही घटना सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत तक्रार तिचे वडील रघुनाथ यशवंत नाईक यांनी सावंतवाडी पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की नाईक यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटल्या नुसार मुलगी शेजार्या सोबत दुचाकीवर गोव्यात कामाला जायला निघाली होती. यावेळी ती आंब्याचे कास येथे मंदिरात पाया पडायला थांबली असता त्या ठिकाणी संशयिताने येत दांड्याने हल्ला केला. तसेच तिने घाबरून पालायन केले असता. जीवे मारण्याची धमकी दिली. या सर्व प्रकारात तिला गंभीर दुखापत झाली. असे म्हटले आहे त्यानुसार संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साटेलीतील युवतीला दांड्याने मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल…..
- Post published:फेब्रुवारी 2, 2022
- Post category:बातम्या / सावंतवाडी
- Post comments:0 Comments
You Might Also Like
आंबेडकर जयंतीनिमित्त महामानवाला करू सलाम काव्य संमेलनाचे रविवार दि. १९ एप्रिल २०२६ रोजी आयोजन
तिलारी घाटात पर्यटकांच्या कारला अपघात
कर्मचाऱ्यांना न्याय आणि सामान्य जनतेला सुरक्षितता मिळवून देण्यासाठी भाजपा आणखी तीव्र आंदोलन छेडणार! – विनायक राणे यांचा इशारा
