सावंतवाडी तालुक्यातील साटेली येथे युवतीला दांड्याने मारहाण करत तिला जीवे मारण्याची धमकी या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर गंगाराम सावंत असे संशयिताचे नाव आहे. ही घटना सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत तक्रार तिचे वडील रघुनाथ यशवंत नाईक यांनी सावंतवाडी पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की नाईक यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटल्या नुसार मुलगी शेजार्या सोबत दुचाकीवर गोव्यात कामाला जायला निघाली होती. यावेळी ती आंब्याचे कास येथे मंदिरात पाया पडायला थांबली असता त्या ठिकाणी संशयिताने येत दांड्याने हल्ला केला. तसेच तिने घाबरून पालायन केले असता. जीवे मारण्याची धमकी दिली. या सर्व प्रकारात तिला गंभीर दुखापत झाली. असे म्हटले आहे त्यानुसार संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साटेलीतील युवतीला दांड्याने मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल…..
- Post published:फेब्रुवारी 2, 2022
- Post category:बातम्या / सावंतवाडी
- Post comments:0 Comments
You Might Also Like
शिवसेनेचे बुधवळे – कुडोपी सरपंच तुषार पाटणकर भाजपात दाखल
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज 211 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह
आमदार वैभव नाईक यांनी शासनाच्या निषेधाचे पत्र देत मंत्र्यांसोबत फोटोसेशन करावे.-अमित इब्रामपूरकर
