You are currently viewing गांजाची विक्री करणाऱ्या तिघांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

गांजाची विक्री करणाऱ्या तिघांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

गांजाची विक्री करणाऱ्या तिघांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

353 ग्रॅम गांजा, दुचाकी, मोबाईलसह 2 लाख 23 हजारांचा मुद्देमाल जप्त

रत्नागिरी :

रत्नागिरी जिल्हयामध्ये अंमली पदार्थांना प्रतिबंध व कारवाई करण्याचे अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड, यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस सुचना दिल्या होत्या.

त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरीचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व अंमलदार हे रत्नागिरी शहरात दि. २६/०४/२०२५ रोजी पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी शहरातील पटवर्धन वाडी ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जाणारे रोडवर उद्यमनगर येथे तीन इसम दोन दुचाकीवर संशयित हालचाली करताना दिसुन आले.

 

पथका मार्फत संशयित इसमांची खात्री करता त्यांचेकडे गांजा हा अंमली पदार्थ मिळुन आला. त्याचे वजन करता ते एकुण ३५३ ग्रॅम इतके झाले. संशयित इसम (१) अत्ताउल्ला सलिम पटेल, वय ३५ वर्षे, रा. उद्यमनगर, ता. जि. रत्नागिरी (२) फहाद मुस्ताक पाटणकर, वय २७ वर्षे, शिवाजीनगर, ता. जि. रत्नागिरी (३) आयान अजिज मुल्ला, वय २४ वर्षे, रा.उदद्यमनगर, ता. जि. रत्नागिरी यांना लागलिच ताब्यात घेण्यात आले व त्यांचे विरूध्द अंमली पदार्थ कायद्यान्वये रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तिघांच्या ताब्यातुन ३५३ ग्रॅम गांजा व दुचाकी MH-08 AT-6792 व MH-08 AV-4630 व चार मोबाईल असा एकुण २,२३,३५०/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

ही कामगिरी

१) पोऊनि/श्री. शिंदे,

२) पोऊनि/श्री. पवार

३) पोहवा/२५१ शांताराम झारे

४) पोहवा/४७७ नितीन डोमणे

५) पोहवा/९०९ विजय आंबेकर

६) पोहवा/१०६७ अमित कदम

७) पोहवा/२६२ विवेक रसाळ

८) पोहवा/२६५ योगेश नार्वेकर

९) पोहवा/१४०८ योगेश शेट्ये

१०) पोहवा/१३६२ भैरवनाथ सवाईराम

११) पोहवा/१४१० सत्यजित दरेकर

१२) मपोहवा/११४७ वैष्णवी यादव या पथकाने केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा