You are currently viewing उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2021 प्रवेशिका पाठविण्यासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2021 प्रवेशिका पाठविण्यासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी

 उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार – 2021 च्या प्रवेशिका पाठविण्यासाठी 15 फेब्रुवारी 2022 रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रवेशिकांना पुरेसा प्रतिसाद नसल्यामुळे तसेच विविध स्तरांवरुन मुदतवाढ देण्याची मागणी होत असल्यामुळे मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी जास्तीत जास्त पत्रकारांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा