You are currently viewing साईमंदीर देवस्थान – वेंगुर्ले आगार च्या वतीने जिल्हा बॅंकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मनिष दळवी यांचा सत्कार

साईमंदीर देवस्थान – वेंगुर्ले आगार च्या वतीने जिल्हा बॅंकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मनिष दळवी यांचा सत्कार

साईमंदीर देवस्थान , वेंगुर्ले आगार चा २५ वा वर्धापनदिनाला जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी भेट दिली असता साईभक्तांच्यां वतीने एस्. टी.कामगारांचे जेष्ठ नेते प्रकाश रेगे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला .
साईमंदीर देवस्थान – वेंगुर्ले आगार चा २५ व्या वर्धापन दिनाचा उस्तव दिनांक १ व २ फेब्रुवारी या कालावधीत संपन्न होणार आहे . या उस्तवाची सुरुवात मनिष दळवी यांच्या हस्ते साईबाबांना श्रीफळ ठेवुन करण्यात आले.
यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरदजी चव्हाण , जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , ता.चिटनीस जयंत मोंडकर , नगरसेविका श्रेया मयेकर , महिला मोर्चा च्या रसीका मठकर , ता.का.का.सदस्य रविंद्र शिरसाठ , युवा मोर्चा चे तुषार साळगांवकर , बुथप्रमुख शेखर काणेकर व नितीश कुडतरकर , एस्. टी.कर्मचारी विठ्ठल जाधव , गौतम वागळे , मठकर तसेच साईमंदीर देवस्थान कमिटीचे सदस्य व साईभक्त उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen + 16 =