You are currently viewing श्रीगोंदा येथील श्रीम.स्वाती काळे/झेंडे यांच्या ‘अंतरीची अक्षरलेणी’ काव्यसंग्रह प्रकाशित

श्रीगोंदा येथील श्रीम.स्वाती काळे/झेंडे यांच्या ‘अंतरीची अक्षरलेणी’ काव्यसंग्रह प्रकाशित

नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यामधील चिखली या गावातील सुप्रसिद्ध साहित्यिका *श्रीम स्वाती काळे/झेंडे* यांचा *अंतरीची अक्षरलेणी* हा काव्यसंग्रह परीस प्रकाशन पुणे यांनी नुकताच प्रकाशित केला असून काव्यसंग्रहाच्या नावास साजेसे असे अप्रतिम मुखपृष्ठ सुप्रसिद्ध चित्रकार अरविंद शेलार यांनी रेखाटले आहे .
प्रा.शिक्षिका असणाऱ्या स्वाती काळे या संसार, नोकरी सांभाळत असतानाच साहित्यिक व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत.रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या त्या अ नगर जिल्हा प्रवक्ता आहेत.अनेक काव्यसंमेलने त्यांनी गाजवली आहेत. राज्यस्तरीय ऑनलाईन काव्यसंमेलनाचे अध्यक्ष पदही भूषवले आहे.अनेक स्पर्धांचे परिक्षणही त्यांनी केले आहे. साहित्यिक क्षेत्रात दमदार पदार्पण करत त्यांनी श्रीगोंदा तालुक्याचे नाव राज्यात झळकवले आहे.
अभ्यासक्रमातील सुप्रसिद्ध कवी ,गीतकार श्री हनुमंत चांदगुडे प्रस्तावना लिहिताना म्हणतात..काळजात साठलेला आठवणींचा कोलाज पेलण्याचे सामर्थ्य कवयित्री स्वाती काळे यांच्या सृजनात मला सापडले.त्यांच्या शब्दलेण्यांतून अंतरीचे भावविश्व वाचकांसमोर सगुण साकार झाले हेच या काव्यसंग्रहाचे सर्वात मोठे बलस्थान आहे.
शुभेच्छारूपी पाठराखण करणारे श्री अरुण धामणे साहेब,शिक्षणाधिकारी निरंतर,जि.प. नागपूर व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मराठी अभ्यास मंडळ,मानव विज्ञान शाखेचे प्रा.संदिप सांगळे यांनी साहित्यिक क्षेत्रात अंतरीची अक्षरलेणी आपला वेगळा कवयित्री स्वाती काळे यांना काव्यसंग्रहासाठी व भावी साहित्यिक वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…

काव्यसंग्रहाचे नाव:-
अंतरीची अक्षरलेणी
प्रकाशक:-परीस पब्लिकेशन,पुणे
मुखपृष्ठ:-अरविंद शेलार
पाने:१२०
स्वागत मूल्य:१५०(पोस्टेज खर्चासह)
संपर्क : 9767930381 स्वाती काळे

प्रतिक्रिया व्यक्त करा