यासाठी राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य शाखा सिंधुदुर्ग च्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन
पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडी या जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक ,उपक्रमशील शिक्षक , राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक ,महाराष्ट्र राज्यातील आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा निर्माते, महाराष्ट्र राज्यातील उपक्रमशील व नवनिर्मितीचा ध्यास घेतलेल्या शिक्षकांसाठी प्रेरणादायक शैक्षणिक कामकाज करून नावलौकिक मिळविलेले दत्तात्रय वारे यांच्यावर पुणे जिल्हा परिषदेने निलंबनाची कार्यवाही केलेली आहे .त्याकरिता राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने राज्य पदाधिकारी यांनी नुकतीच आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा निर्माते दत्तात्रय वारे यांच्या घरी जाऊन त्यांची व्यथा जाणून घेतली .तसेच त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना संघटनेच्यावतीने आधार देऊन आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व आपल्या कर्तुत्वाला पाठबळ देण्यासाठी राज्य संघटनेच्या वतीने प्रयत्न केले जातील . या घटनेने वारे कुटुंबियांना या घटनेचा एवढा धक्का बसला आहे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या तोंडातून शब्द बाहेर येताना आपोआपच अश्रू अनावर होत आहेत .प्रामाणिकपणे केलेल्या कामाचे हेच चीज सुसंस्कृत महाराष्ट्राच्या शैक्षणिक पंढरीमध्ये मिळाले का प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे .वारे कुटुंबियांच्या भेटीप्रसंगी राज्याध्यक् – सुभाष जिरवणकर राज्य कार्याध्यक्षराज्य – दशरथ शिंगारे ,राज्य सरचिटणीस -अनंता जाधव ,राज्य उपाध्यक्ष – संभाजी ठुबे ‘राज्य सहसचिव – माधव वायचाळ , सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष -शिवराज सावंत ,पुणे जिल्हाध्यक्ष -भिमराव शिंदे, हिंगोली जिल्हाध्यक्ष -गंगावणे , हिंगोली सरचिटणीस -पांडुरंग गिरी या संघटनेच्या शिष्टमंडळाने वारे कुटुंबियांची भेट घेतली व त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला . त्याचप्रमाणे राज्य संघटना आपल्या पाठीशी राहील अशी ग्वाही दिली .महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातून एकाच वेळी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देऊन दत्तात्रय वारे मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा वाबळेवाडी जिल्हा पुणे यांच्यावर झालेले निलंबन मागे घेऊन त्यांच्या कार्याचा गौरव करावा असे निवेदन द्यावे असे संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या सभेमध्ये ठरलेले होते .त्यानुसार 25 जानेवारी 2022रोजी महाराष्ट राज्याचे मुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे साहेब यांना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांचे मार्फत रविंद्र मठपती उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन सिंधुदुर्ग यांच्या कडे निवेदन देऊन माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाकडे पाठवण्याची विनंती संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेने केली .सदरचे निवेदन मुख्यमंत्री कार्यालय महाराष्ट्र राज्य यांना वेळीच पाठविण्याची ग्वाही रविंद्र मठपती उपजिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी दिली .यावेळी निवेदन देताना दशरथ शिंगारे – राज्य कार्याध्यक्ष , शिवराज सावंत – जिल्हाध्यक्ष ,संदीप शिंदे – सरचिटणीस ,विजय भोगले – मार्गदर्शक सल्लागार ,विठ्ठल कदम -मुख्य संघटक ,उदय गोसावी – कोषाध्यक्ष आदी उपस्थित होते .