You are currently viewing फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीवर महाविकास आघाडी पॅनेलचा विजय…

फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीवर महाविकास आघाडी पॅनेलचा विजय…

भाजपा प्रणीत पॅनलला मोठा धक्का; केवळ ५ उमेदवारच विजयी…

कणकवली

फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी प्रणित संकल्प पॅनल ने भाजप प्रणित पॅनेलचा दणदणीत पराभवाचा धक्का दिला. संकल्प पॅनलचे तब्बल १० उमेदवार विजयी झाले. तर विकास पॅनलचे ५ उमेदवार विजयी झाले.

प्रतिष्ठेच्या बनलेल्या या निवडणुकीत दोन्ही बाजूने प्रतिष्ठा पणाला लागली होती. ही निवडणूक घेण्याच्या मुद्द्यावरूनही जोरदार घडामोडी घडल्या होत्या. प्रांताधिकारी कार्यालयात आमदार वैभव नाईक यांनी दिलेल्या इशाऱ्याची देखील निवडणुकीपूर्वी जोरदार चर्चा झाली होती. अशा स्थितीत झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडी पॅनलचे जिल्हा परिषद सदस्य संजय आंग्रे यांचा करिश्मा या निवडणुकीत दिसला. काल सोमवारी रात्री उशिरापर्यंत मतमोजणी चालली. व त्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला. पॅनल निहाय विजयी झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे: संकल्प पॅनल – पॅनल प्रमुख संजय आंग्रे ५४१, संदेश सावंत ४८८, आनंद मर्ये ४५८, सुभाष सावंत ४३३, दत्तात्रय पवार ४२३ रंजन नेरूरकर ४११ विठोबा तायशेटे ३९८, महेश सावंत ३९४, चंद्रशेखर लिंग्रस ३६८, रमेश भोगटे ३६१.

विकास पॅनल: राजन चिके ४८७, सदानंद उर्फ बबन हळदिवे ४१६, मनीष गांधी ४१४, अभिनंदन डोर्ले ३८०, श्रीकांत आपटे ३६७.

या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अ श्री म्हसकर यांनी काम पाहिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा