You are currently viewing सिंधुदुर्गात राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक आपल्या मागण्यांसाठी एकवटले

सिंधुदुर्गात राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक आपल्या मागण्यांसाठी एकवटले

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांना विविध मागण्यांचे दिले निवेदन

महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नामदार उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व नामदार वर्षाताई गायकवाड शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री महाराष्ट्र राज्य यांना माननीय जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांचेमार्फत निवेदन दशरथ शिंगारे राज्य कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य व सिंधुदुर्ग जिल्हा पदाधिकारी यांनी दिले .निवेदनामध्ये राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या विविध प्रश्नांचा समावेश होता .त्यामध्ये राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना दोन जादा वेतनवाढ पूर्वीप्रमाणे देण्यात याव्यात . कायमस्वरूपी ओळख पत्र देण्यात यावे .वार्षिक सर्वसाधारण बदल्यांमध्ये संवर्ग -१ मध्ये समावेश करण्यात यावा . शासन आदेशानुसार राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी , उपशिक्षणाधिकारी , गटशिक्षणाधिकारी ,शिक्षण विस्तार अधिकारी , केंद्रप्रमुख या पदांवर पदोन्नती देण्यात यावी .राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांना प्रमाणेच राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना एस टी व रेल्वे प्रवास सवलत मोफत देण्यात यावी . शासनाच्या विविध समित्यांवर राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना सेवाजेष्ठता प्रमाणे सदस्यत्व द्यावे .सर्व जिल्हा परिषदेच्या शिक्षण समिती मध्ये राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना प्रतिनिधित्व द्यावे .अशा प्रकारच्या विविध मागण्यांचे निवेदन राज्य संघटनेच्यावतीने देण्यात आले .जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्यावतीने रविंद्र मठपती उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन सिंधुदुर्ग यांनी संघटना पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली . व आपल्या मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे साहेब , महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या विभागाकडे पूर्ततेसाठी पाठविले जाईल. अशा प्रकारचे आश्वासन दिले .या भेटीप्रसंगी संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष -शिवराज सावंत, सरचिटणीस -संदीप शिंदे, मार्गदर्शक सल्लागार – विजय भोगले ,मुख्य संघटक – विठ्ठल कदम ,कोषाध्यक्ष – उदय गोसावी आदी उपस्थित होते .

राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य व  शाखा सिंधुदुर्ग मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे व वर्षाताई गायकवाड शालेय व क्रीडा मंत्री महाराष्ट्र राज्य यांना राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या विविध मागण्यांचे निवेदन  जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या वतीने रविंद्र मठपती उपजिल्हाधिकारी  सामान्य प्रशासन  सिंधुदुर्ग यांना निवेदन देतेवेळी दशरथ शिंगारे – राज्य कार्याध्यक्ष , शिवराज सावंत – सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष , संदिप शिंदे – सरचिटणिस , विजय भोगले – सल्लागार ,विठ्ठल कदम  – मुख्य संघटक,उदय गोसावी – कोषाध्यक्ष

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − 9 =