You are currently viewing वेंगुर्ला येथे ३० जानेवारीला जिल्हास्तरीय वेंगुर्ला ‘श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन

वेंगुर्ला येथे ३० जानेवारीला जिल्हास्तरीय वेंगुर्ला ‘श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन

वेंगुर्ले

वेंगुर्ला नगरपरिषद वेंगुर्ला यांच्या नाटककार मधुसुदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृह कॅम्प या सिंधुदुर्गातील प्रथम वातानुकुलीत सभागृहामध्ये प्रो फिटनेस व्यायामशाळा वेंगुर्ला तर्फे ३० जानेवारी २०२२ रोजी संध्याकाळी ०६.०० ते ०९.०० या वेळेत जिल्हास्तरीय वेंगुर्ला ‘श्री’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक रु. १०,०००/-, मोस्ट इम्प्रूव्हर साठी रु. ५०००/-, बेस्ट पोजर साठी रु. ३०००/- तसेच ग्रुप विनरसाठी रोख रक्कम तसेच कायम स्वरूपी चषक देण्यात येणार आहे. सदरची स्पर्धा शासनाच्या कोविड-१९ च्या नियमांचे पालन करून आयोजित करण्यात येणार आहे. तरी जिल्हास्तरीय क्रीडा प्रेमींनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रो फिटनेस जिम वेंगुर्ला तर्फे श्री. राजेश हिरोजी यांनी केले आहे.संपर्क : राजेश हिरोजी : ९४२२०५४७९९, राहुल कामत आडारकर : ९४२०३९८३२०

प्रतिक्रिया व्यक्त करा