You are currently viewing ३ फेब्रुवारीला सावंतवाडीत श्री देव उपरलकर देवस्थानचा वार्षिक उत्सव

३ फेब्रुवारीला सावंतवाडीत श्री देव उपरलकर देवस्थानचा वार्षिक उत्सव

सावंतवाडीतील जागृत देवस्थान आणि ३६५ खेड्यांचा अधिपती अशी ख्याती असलेल्या श्री देव उपरलकर देवस्थानचा वार्षिक अभिषेक पुजा सोहळा ३ फेब्रुवारीला साजरा होणार आहे. यावेळी सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान चे मानकरी विद्याधर नाईक शितप यांनी केले आहे.

दरवर्षी सावंतवाडी राज्यघराण्याचे दैवत असलेल्या देवस्थान चा वाढदिवस मोठा उत्सव म्हणून साजरा करण्यात येतो. तसेच यावर्षी ही या निमित्ताने सकाळपासून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी अभिषेक व पूजा, उत्सवनिमित्त पूजापाठ, त्यानंतर सर्व भाविकांना दर्शन व तीर्थप्रसाद, नामांकित भजनी कलाकारांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. तर सायंकाळी सात वाजता सावंतवाडी येथील महापुरुष दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे.

देवस्थानचे मानकरी विद्याधर नाईक शितप व शुभम नाईक शितप यांनी कोविड -१९ च्या पार्श्‍वभूमीवर भाविकांनी सोशल डिस्टंसिंग व मास्कचा वापर करून कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen + fourteen =