You are currently viewing “आरोग्यदायी कार्य” पुरस्कार देऊन मुस्लिम हेल्थ ॲण्ड वेल्फेअर फाउंडेशनचा सावंतवाडी रोटरी क्लबकडून सन्मान

“आरोग्यदायी कार्य” पुरस्कार देऊन मुस्लिम हेल्थ ॲण्ड वेल्फेअर फाउंडेशनचा सावंतवाडी रोटरी क्लबकडून सन्मान

सावंतवाडी

आरोग्यासह सामाजिक क्षेत्रात मोलाचे काम करणार्‍या सावंतवाडी येथील मुस्लिम हेल्थ ॲण्ड वेल्फेअर फाउंडेशनचा येथील रोटरी क्लबच्यावतीने सर्वोत्कृष्ट सामाजिक व आरोग्यदायी कार्य पुरस्कार देवून गौरव करण्यात आला आहे. नुकताच माजी पालकमंत्री तथा आमदार दिपक केसरकर व रोटरीचे अध्यक्ष साईप्रसाद हवालदार यांच्याहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी मुस्लिम फाउंडेशनचे अध्यक्ष सोहाब बेग, उपाध्यक्ष हिदायतुल्ला खान, सचिव सलीम मुल्ला, सहसचिव रिजवान पटेल, सहखजिनदार मोहसीन मुल्ला, सदस्य तबरेज बेग, नदीम दुर्वेश आदींसह रोटरी, इनरव्हील व रोट्रॅक्टचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − eleven =