You are currently viewing ओम गणेश मित्र मंडळ शिरवल यांच्या वतीने माघी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन

ओम गणेश मित्र मंडळ शिरवल यांच्या वतीने माघी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन

ओम गणेश मित्र मंडळ शिरवल यांच्या वतीने माघी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन

१३ आणि १४ फेब्रुवारी रोजी विविध धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

कणकवली
ओम गणेश मित्र मंडळ शिरवल यांच्यावतीने शिरवल ग्रामपंचायतीच्या समोर माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या निमित्ताने मंगळवार दि. १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वा. श्री गणेशमूर्ती चे आगमन,पूजन,आरती,तिर्थ प्रसाद , सकाळी ११ वा.श्री.सत्यनारायणाची महापुजा, वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ भास्कर गंगाराम चाळके शिवडाव यांच्या उपस्थितीत १२.३० वा.महाआरती , दुपारी १.०० ते ३.०० वा. महाप्रसाद, दुपारी ३.०० ते ५.०० वाजता स्थानिकांची सुस्वर भजने, , सायं. ७: ३०ते ८:३० वा.हरीपाठ वारकरी संप्रदाय शिरवल, रात्रौ ८.३० ते ९ वा. महाप्रसाद रात्री १० वाजता अमर जाधव क्रिएशन प्रस्तुत दोन अंकी धमाल विनोदी नाटक कोर्टात खेचीन सादर होणार आहे.

बुधवार १४ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३० वाजता श्री गणेश मूर्तीची आरती, तीर्थ प्रसाद ,दुपारी १ ते ३ वाजता महाप्रसाद, दुपारी ३ ते ४ वाजता महिलांसाठी हळदीकुंकू, सायंकाळी ४ वाजता गणेश मूर्ती विसर्जन मिरवणूक आणि कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
तरी या कार्यक्रमाचा सहकुंटुंब व मित्रमंडळीसह सहभागी होऊन तिर्थप्रसाद व महाप्रसादाचा आणि सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ओम गणेश मित्र मंडळ शिरवल यांच्यावतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 1 =