You are currently viewing सुखी जीवनाची गुरुकिल्ली काय ?

सुखी जीवनाची गुरुकिल्ली काय ?

🍥 *पाप – पुण्य समज, गैरसमज* 🍥

निसर्गनियमानुसार खर पुण्य म्हणजे काय ते कसं मिळवायचं तसेच खर पाप म्हणजे काय ते टाळायचं कसं या संदर्भात *सद्गुरू श्री वामनराव पै* यांनी *पाप – पुण्य समज, गैरसमज* या ग्रंथात अचूक मार्गदर्शन केलेला आहे.

*प्रश्न २० :- सुखी जीवनाची गुरुकिल्ली काय ? कृपया थोडक्यात स्पष्टीकरण करावे .*

*उत्तर :- … क्रमशः पुढे ….*

नामस्मरणाचा म्हणजेच ईश्वरचिंतनाचा महिमा जगातील सर्व संतांनी एक मुखाने वर्णन केलेला आहे .

ईश्वरस्मरण करुन व ईश्वरस्मरणाच्या महतीची स्वतः प्रचीती अनुभवून इतरांस नामस्मरण करण्यास प्रवृत्त करणारी माणसे समाज पुरुषाचे अलंकार होत .

दुसरा मुद्दा असा की निग्रहाने दुष्कर्मे टाळणे ही सुध्दा सुखी जीवनाची गुरुकिल्ली आहे . सत्कर्मे करण्यास मनुष्य जितका सहज टाळाटाळी करतो तितक्याच सहजपणे तो दुष्कर्मे करण्यास प्रवृत्त होतो .

दुष्कर्मांच्या द्वारे माणूस स्वतःच्या हातानी स्वतःची कबर खणत असतो , याची जाणीव बहुसंख्य लोकांना नसते . खून , चोरी , दरोडेखोरी करणारी माणसे , इतरांची निंदा – नालस्ती व द्वेष – मत्सर करणारी माणसे प्रत्यक्षांत दिव्य बँकेतील त्यांचे पुण्य झपाट्याने खर्च करीत असतात .

दुसऱ्यांना फसविल्याने , त्यांना त्रास दिल्याने किंवा त्यांचा छळ केल्याने त्या माणसांना जे दुःख होते , तेच दुःख बुमरँग होऊन परत आपणाकडे येते याची पुसटशी कल्पनासुध्दा बहुसंख्य नसते .

स्त्रियांना छळणारे , दलितांना पिडणारे , काळा बाजार करणारे , भाविक भोळसट लोकांना लुबाडणारे बुवा , बाबा , भगत कुठल्याही कारणास्तव धर्मांतर घडवून आणणारे धर्मांध धर्मवेडे , अन्न व औषध अशा जीवनावश्यक पदार्थात भेसळ करणारे , अशी निरनिराळ्या प्रकारची दुष्कर्मे करणारी व त्यांना प्रोत्साहन देणारी माणसे लोकांवर भयंकर प्रसंग आणून भवितव्यात स्वतःच्या हातानी स्वतःच भेसूर व भयाण जीवनाला आमंत्रण देतात .

म्हणून निग्रह करुन माणसाने वरील व अन्य प्रकारच्या दुष्कृत्यांना कटाक्षाने टाळले पाहिजे . सर्व प्रकारची दुष्कृत्ये एका बाजूने माणसाचे थोडेफार असलेले दिव्य बँकेतील पुण्य अधिकच घटवितात व दुसऱ्या बाजूने पापाचा संचय करण्याची प्रक्रिया घडवून आणतात .

म्हणून *आपल्या हातून दुष्कर्मे घडणार नाहीत अशी कटाक्षाने काळजी घेणे ही सुखी जीवनाची गुरुकिल्ली आहे .*

थोडक्यात *शुभ चिंतन करणे , शुभ इच्छा करणे , शुभ बोलणे व शुभ करणे , ही सुखी जीवनाची गुरुकिल्ली आहे .*

 

*– सदगुरु श्री वामनराव पै .*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा