You are currently viewing शहाणपणाचा अभाव तेथे दु:खाचा सुकाळ

शहाणपणाचा अभाव तेथे दु:खाचा सुकाळ

जीवनविद्येने एक सिद्धांत मांडला, ….

*”शहाणपणाचा अभाव तेथे दु:खाचा सुकाळ,*

आणि

*शहाणपणाचा “प्रभाव” तेथे सुखाचा सुकाळ”.*

 

*जीवनामध्ये माणसाजवळ शहाणपण पाहिजे.* आज जगामध्ये बघा, घरात, समाजात, राष्ट्रात, विश्वात सर्व ठिकाणी तंटे-बखेडे, मारामाच्या, युद्ध-लढाया आहेत. कोणीही सुखी नाही. शहाणपणाचा अभाव हा माणसाच्या दुःखाला कारणीभूत आहे. *शहाणपणाचा “प्रभाव” माणसाच्या सुखाला कारणीभूत आहे.* म्हणून

जीवनविद्या *”शहाणपणाला पर्याय नाही”* असे सांगते.

*शहाणपण नसेल तर तुम्हांला सुखी करण्याचे सामर्थ्य ब्रह्मदेवाला पण नाही.* आता प्रश्न निर्माण होईल, …….

*शहाणपण कशात आहे? ……*

जीवनविद्या एका वाक्यात सांगते,

*”शुभ नियती’’ निर्माण करण्यात “शहाणपण” आहे”.* आणि

“अशुभ नियती” निर्माण करण्यामध्ये *मुर्खपणाचा कळस आहे.*

नियती ही मानवी जीवनामध्ये फार महत्त्वाची आहे. *मानवी जीवन नियंत्रित केलं जातं ते नियतीकडून.*

पण *नियती म्हणजे काय?*

आज अनेक साहित्यिक, अनेक माणसं नियती म्हणजे *कुठली तरी अशी एक काल्पनिक शक्ती मानतात.* जी आपल्यापासून कुठेतरी दूर आहे, ती नियती आपल्या जीवनावर नियंत्रण करते, असा एक समज आहे. *काल्पनिक नियती माणसाच्या सुख-दुःखाला कारणीभूत ठरते.* कल्पनेच्या पलीकडे किंवा आकाशाच्या पलीकडे किंवा काल्पनिक म्हणा, लहरी म्हणा, *एखादी शक्ती म्हणा, तिला नियती असे समजून ती नियती आपलं, जीवन नियंत्रित करते, असा एक गैरसमज आहे.*

*नियती आपण निर्माण करतो हा जीवनविद्येने फार मोठा सिद्धांत मांडलेला आहे.* जसं मुलांना आपण जन्म देतो, तसं नियतीला आपण जन्म देतो. आणि *आपण जी नियती निर्माण करतो, ती नियती आपल्या सुख दुःखाला कारणीभूत ठरते.*

नियती दोन प्रकारची, *एक शुभ नियती व अशुभ नियती.*

*अशुभ नियती निर्माण करायची का शुभ नियती निर्माण करायची हे आपण ठरवायचं असतं.* म्हणून, …

*’‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार”*

 

*- सद्गुरु श्री. वामनराव पै.*

प्रतिक्रिया व्यक्त करा