You are currently viewing १७ सप्टेंबरला काँग्रेस रोजगार व अर्थव्यवस्था बचाव दिन साजरा करणार- इर्शाद शेख

१७ सप्टेंबरला काँग्रेस रोजगार व अर्थव्यवस्था बचाव दिन साजरा करणार- इर्शाद शेख

सिंधुदुर्ग :

गुरुवार दिनांक 17 सप्टेंबर 2020 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात 17 सप्टेंबर हा दिवस रोजगार व अर्थव्यवस्था बचाव दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. 2014 मध्ये केंद्रामध्ये भाजपचे सरकार सत्तेवर आले आणि सन्माननीय श्री. नरेंद्र मोदी हे आपल्या देशाचे पंतप्रधान झाले त्यानंतर जे काही चुकीचे निर्णय केंद्र सरकारने घेतले उदाहरणार्थ नोटबंदी, चुकीच्या पद्धतीने जीएसटीची अंमलबजावणी व चुकीच्या पद्धतीचे आर्थिक धोरण यामुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे.

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी 2 कोटी लोकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते परंतू असलेला कोट्यवधी लोकांचा रोजगार केंद्र सरकारच्या अविचारी चुकीच्या धोरणांमुळे गेला. बेरोजगारीचा दर गेल्या पंचेचाळीस वर्षातील उच्चांकावर पोहोचला म्हणून आम्ही सन्माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांचा जन्म दिवस रोजगार व अर्थव्यवस्था बचाव दिन म्हणून साजरा करणार आहोत असे सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते श्री. इर्शाद शेख यांनी आमच्या प्रतिनिधी शी बोलताना सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − eight =