कुडाळ:
आज २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जिजामाता चौकात सकाळी ठीक ९.३० वाजता भारतमातेचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले आणि समस्त भारतीयांना विवेक पंडित आणि तृप्ती वालावलकर यांच्या कडून आव्हान करण्यात आले की देश स्वतंत्र करण्यासाठी ज्या क्रांतिवीराने बलिदान दिले तुरुंगवास भोगला अश्या क्रांतिवीरांचे बलिदान धर्मात आणि जाती पाती मध्ये भांडून वाया घालवू नका कुठेही अनुचितप्रकार घडला तर सरकारी मालमतेचे नुकसान करू नका देश विकासाच्या दृष्टीने पुढे नेण्यासाठी एकत्र या तरच आपला देश खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम होईल.
यावेळी राजू राऊळ, संजय शारबीद्रे, विवेक पंडित, मुतालिक,बंड्या सावंत,मिलिंद देसाई,तृप्ती वालावलकर,देवेश रेडकर,रजत बबडी,राम सावंत,दिनेश साळुंखे आदी उपस्थित होते.