You are currently viewing आमदार नितेश राणे यांची आज पुन्हा कणकवली पोलिस ठाण्यात

आमदार नितेश राणे यांची आज पुन्हा कणकवली पोलिस ठाण्यात

झाली ४० मिनिटे चौकशी

आज दुसऱ्या दिवशी झाला हल्ला प्रकरणाचा तपास

सोमवारी झाली होती दीड तास चौकशी

कणकवली

शिवसैनिक संतोष परब हल्याप्रकरणी आमदार नितेश राणे कणकवली पोलिस स्थानकात आज मंगळवार २५ जानेवारी रोजी पुन्हा चौकशीसाठी हजर झाले होते. सकाळच्या सत्रात तब्बल ४० मिनिटा पेक्षा जास्त वेळ त्यांची चौकशी पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्यासमवेत करण्यात आली. यावेळी आमदार राणे यांच्या सोबत त्यांचे वकील संग्राम देसाई उपस्थित होते.
जिल्हा बॅंक निवडणुकीदरम्यान शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांच्यावर शिवसेनेच्यावतीने आरोप करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी बोलावले होते आणि आज सकाळी ११.३० ते १२.१० पर्यंत म्हणजे तब्बल चाळीस मिनिटे त्यांची चौकशी कणकवली पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या कडून करण्यात आली त्यामुळे आमदार नितेश राणे हे तपास कार्याला सहकार्य करत असल्याचे दिसून येत आहे.
काल सोमवारी २४ जानेवारी रोजी सकाळी आमदार नितेश राणे हे कणकवली पोलिस स्थानकात दाखल होऊन तब्बल दीड तास पोलिसांनी त्यांची चौकशी केली होती. त्या वेळी आमदार नितेश राणे यांनी देखील पोलिसांना सहकार्य करणार नसल्याचे सांगितले होते. आज पुन्हा ते कणकवली पोलिस ठाण्यात हजर झाले आणि पोलिसांच्या चौकशीला सामोरे गेले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा