You are currently viewing *बाळासाहेबांनी ज्यांचा सन्मान केला त्यांच्यावर  शीतोंडे उडवून शिवसेनेचा महाराष्ट्रद्रोह  ; आशिष शेलार.*

*बाळासाहेबांनी ज्यांचा सन्मान केला त्यांच्यावर शीतोंडे उडवून शिवसेनेचा महाराष्ट्रद्रोह ; आशिष शेलार.*

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांना सन्मान केला त्या व्यक्तींवर शिवसेना शिंतोडे उडवून महाराष्ट्रद्रोह का करतेय?, असा सवाल भाजपा नेते आशिष शेलार यांनी केला आहे. काँग्रेससोबत जाऊन शिवसेनेच्या बुद्धीचा चक्काजाम झालाय का? असा टोलाही त्यांनी लगावला.

 

शेलार यांनी ट्विटद्वारे आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, “देशांतर्गत विषयात उगाच ढवळाढवळ करणाऱ्या रिहाना, ग्रेटा थॅनबर्ग, मिया खलिफा या परदेशी सेलिब्रेटिंच्या तालावर काँग्रेस-शिवसेनेने ‘पॉप डान्स’ केला. तर या परदेशी सेलिब्रेटिंना सचिन तेंडुलकर, लतादीदींनी खडसावले, अण्णा हजारेंनी लोकशाहीचा सन्मान केला तर त्यांच्याविरोधात धिंगाणा घातला.”

“वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांचा प्रचंड सन्मान केला त्या भारतरत्न, महाराष्ट्रभूषण व्यक्तींवर शिवसेना शिंतोडे उडवून महाराष्ट्र द्रोह का करतेय?

प्रतिक्रिया व्यक्त करा

five − three =