देवगड
सिंधुदुर्ग जिल्हा जैन परिवार संस्थेच्या जिल्हा अध्यक्षपदी डॉ दीपक मधुकर तुपकर ,(सावंतवाडी) उपाध्यक्षपदी रवींद्र कृष्णा पोकळे,(तरेळे) संजय रमेश मुधाळे,(सावंतवाडी) सचिवपदी दिपराज गुरुदत्त बिजितकर (वेंगुर्ले) कोषाध्यक्ष पदी महावीर मनोहर मांगले (कणकवली) यांची निवड संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्वानुमते करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा जैन परिवार या संस्थेची वार्षिक सभा कणकवली येथे अध्यक्ष अनिल खुंटाळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली . या सभेत प्रारंभी समाजातील दिवंगत समाज बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .तसेच समाजातील गुणवंत यांच्या अभिनंदन करण्यात येऊन त्यांचा यथोचित सत्कार महावीर जयंती स्नेहमेळाव्यात करण्याचे ठरले.
तसेच उर्वरित कार्यकारणी जाहीर करण्यात आली सदस्य.-राजाराम दिगंबर दंताळ,(कणकवली),प्रकाश यशवंत त्रिभुवणे,(ओरोस),चंद्रकांत गणपत पोकळे (फोंडा घाट),अनंत धोंडीराम डोर्ले(शिरगाव)श्रीकृष्ण मनोहर उर्फ (अमोल ) साळवी (कट्टा मालवण),चंद्रप्रभ जिनदास उर्फ नाना बोगार (माणगाव-सावंतवाडी), महिला सदस्य -सौ आशा अनिल खुंटाळे (ओरोस),सौ.पौर्णिमा महावीर मांगले (कणकवली) सौ.अपर्णा अशोक साळवी (कुडाळ), सल्लागार पदी -श्रीधर महादेव उर्फ बाळासाहेब डोर्ले,(फोंडा घाट)अशोक भास्कर ठोंबरे,(वेंगुर्ले)दयानंद यशवंत मांगले (देवगड ) यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. या सभेत मागील सभा आढावा व उपक्रम, आर्थिक जमा खर्च जैन समाज धार्मिक स्थळे, जीर्णोद्धार, संवर्धन, या बाबत विशेष मार्गदर्शन त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व जैन समाज बांधवांचे संघटन यावर चर्चा करण्यात आली.
या निमित्ताने मावळते अध्यक्ष अनिल खुटाळे,नूतन अध्यक्ष डॉ दीपक तुपकर ,जेष्ठ समाजबांधव राजाराम दंताळ तसेच कोकण विभाग दिगंबर जैन कासार समाज अध्यक्ष दयानंद मांगले यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.उपस्थितांचे स्वागत प्रास्तविक आभार सौ.पद्मा दंताळ यांनी मानले. .