You are currently viewing सावंतवाडी रोटरी क्लब च्या वतीने मोफत आरोग्य शिबिर

सावंतवाडी रोटरी क्लब च्या वतीने मोफत आरोग्य शिबिर

सावंतवाडी रोटरी क्लब यांच्यावतीने बुधवारी २६ जानेवारी रोजी सकाळी ९:३० ते दुपारी २:३० वाजेपर्यंत राजवाडा साधले मेस नजीक रोटरी ट्रस्ट फिजिओथेरपी सेंटर येथे मोफत फिजिओथेरपी पूर्व तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सावंतवाडीचे नगरसेवक आनंद नेवगी यांच्या सहकार्याने होत असलेल्या या शिबिरात मानदुखी, सांधेदुखी, पाठदुखी, जुनी सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी, टेनिस एल्बो, गुडघेदुखी, स्नायू दुखी, लचकदुखी, फ्रॅक्चर, पॅरालिसीस, स्पोंडीलिसीस आदी शारीरिक व्याधींवर प्रसिद्ध फिजिओथेरपी तज्ञ रुकाया शेंडेवाले खान आणि अपूर्वा वाडीकर फिजिओथेरपी तपासणी करून मार्गदर्शन करणार आहेत.
अनेकदा आपल्याला कोणता आजार किंव्हा त्यांची आजाराची लक्षणेही समजत नाही. अशावेळी योग्य वेळी तपासणी करून उपचार सुरू ठेवल्यास आजार बरा होतो. मात्र वेळीच तपासणी न केल्यामुळे होणाऱ्या गंभीर आजाराचा खर्च सर्व सामान्यांना परवडणारा नसतो. परंतु वेळीच तपासणी करून आढणाऱ्या आजाराच्या पहिल्या टप्प्यातच उपचार करून या आजारावर कमी खर्चात मात करु शकतो. याच उद्देशाने रोटरी क्लब गेल्या १२ वर्षां पासून मोफत संपूर्ण फिजिओथेरपी तपासणी शिबिराचे आयोजन करीत असुन त्यानंतर संबंधीत रुग्णावर आपल्या फिजोथेरपी सेंटरमध्ये माफक शुल्कात उपचार करीत आहेत.
सावंतवाडी परिसरातील जनतेने या शिबिराचा लाभ घ्यावा तसेच ८०५०५२६४२४ या मोबाईल नंबरवर नाव नोंदणी करावी असे आवाहन सावंतवाडी रोटरी क्लबचे अध्यक्ष साईप्रसाद हवालदार, सचिव सुधीर नाईक आणि खजिनदार आनंद रासम यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा