You are currently viewing यारा फाउंडेशनच्या केक प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

यारा फाउंडेशनच्या केक प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

कणकवली :

यारा फाऊंडेशन, कणकवली यांच्यामार्फत कणकवली येथे केक प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले. कोविड-१९ च्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत आणि पन्नास टक्के उपस्थितीत हे शिबीर संपन्न झाले.
सध्याच्या कोरोनाच्या काळात अशी प्रशिक्षणे व यारा फाउंडेशनचे उपक्रम फायदेशीर ठरणार अशी प्रतिक्रिया प्रशिक्षणार्थ्यानी व्यक्त केली.

यारा फाउंडेशन मार्फत शैक्षणिक, सामाजिक व व्यवसाईक प्रकल्प राबविले जातात. तसेच सांस्कृतिक क्षेत्रातही यारा फाउंडेशन कार्यरत आहे आणि या सर्व ऊपक्रमांना समाजातील प्रत्येक वर्गातून उत्तम प्रतिसाद मिळत असून प्रत्येकाला त्याचा फायदा होईल.
प्रशिक्षणा वेळी यारा फाउंडेशनचे अध्यक्ष विश्वराज विकास सावंत, श्रेयस अरविंद शिंदे, समीर गोपाळ परब, निलम विजय राणे, मयूर मंगेश ठाकूर, चंद्रशेखर धुरी, गोपाळ लोके ,गार्गी कसालकर, प्राजक्ता कदम व युवा परिवर्तन चे समन्वयक उपस्थितीत होते या सर्वांचे प्रशिक्षणार्थींना खुप मोलाचे मार्गदर्शन लाभले

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 4 =