You are currently viewing आय लव्ह यू

आय लव्ह यू

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी सचिन मस्कर यांची काव्यरचना

“आय लव्ह यू” हे वाक्य
जरी बोलायला धाडसाचे
पण दिसत नाही त्यात
खरे इमोशन्स प्रेमाचे..

“आ”यची “आ”दळआपट
“ल”व्ह मधलं “लफडं”
“यू” यू करत चाचपडतंय
आंधळ्या प्रेमात शेंबडं..

“आय लव्ह यू” बोलले
म्हणजे होत नाही प्रेम
“लागला तर लागला दगड”
असा फसवा लव्हचा गेम..

प्रेम वाक्यातून नाही
तर कृतीतून दिसून येते
हृदयाच्या धडधडण्याने
जसे आयुष्य मिळते..

©️®️ सचिन मस्कर , नवी मुंबई

प्रतिक्रिया व्यक्त करा