You are currently viewing पाप – पुण्य समज, गैरसमज

पाप – पुण्य समज, गैरसमज

 

निसर्गनियमानुसार खर पुण्य म्हणजे काय ते कसं मिळवायचं तसेच खर पाप म्हणजे काय ते टाळायचं कसं या संदर्भात *सद्गुरू श्री वामनराव पै* यांनी *पाप – पुण्य समज, गैरसमज* या ग्रंथात अचूक मार्गदर्शन केलेला आहे.

*प्रश्न १९ :- कृतज्ञता हेच पुण्य व कृतघ्नता हे पाप हा जीवनविद्येचा सिध्दांत स्पष्ट कराल का ?*

*उत्तर :-* *” कृतज्ञता हे पुण्य व कृतघ्नता हे पाप होय “, असा जीवनविद्येचा फार महत्वाचा व मौल्यवान सिध्दांत आहे .*

मातृदेवो भव , पितृदेवो भव , आचार्यदेवो भव , असे म्हणण्यात माता , पिता व आचार्य यांच्याबद्दल कृतज्ञताच प्रगट करणे होय .

माता जन्म देते , पिता जीवन देतो , शिक्षक ज्ञान देतो व सदगुरु शहाणपण , आत्मज्ञान , सुखी जीवनाची गुरुकिल्ली देतात .

” देतो तो देव ” अशी देवाची व्याख्या जीवनविद्या करते . या अर्थाने माता , पिता , शिक्षक , सदगुरु हे देवच आहेत त्यांची सेवा केल्याने व त्यांंच्याशी कृतज्ञ राहिल्याने पुण्यप्राप्ती होते .

त्याचप्रमाणे सुक्ष्म दृष्टीने विचार केला तर देवाने आपल्यावर अगणित उपकार केलेले आहेत . हात , पाय आदि कर्मेंद्रिये , नाक , कान , डोळे आदि ज्ञानेंद्रिये , मन , चित्त , बुध्दी , अहंकार ही अंतरेंद्रिये व स्मरणशक्ती , इच्छाशक्ती , कार्यशक्ती वगैरे सर्व विलक्षण देणग्यांनी युक्त असे उत्कृष्ट मानवी शरीर आपल्याला देवाने विनामूल्य दिलेले आहे .

वास्तविक , देहाचा प्रत्येक अवयव हा अक्षरशः दिव्य व मौल्यवान असून सुध्दा संपूर्ण शरीर प्राप्त होण्यासाठी मानवाला काहीही कष्ट करावे न लागणे व काहीही मोल द्यावे न लागणे ही देवाची फार मोठी कृपा आहे .

*(… क्रमशः …)*

*– सदगुरु श्री वामनराव पै .*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा