You are currently viewing गायन क्षेत्रात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणारी गौरी गोसावी हीचा पाट येथे मंगळवारी विशेष सत्कार

गायन क्षेत्रात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणारी गौरी गोसावी हीचा पाट येथे मंगळवारी विशेष सत्कार

कुडाळ :

गायन क्षेत्रात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणारी ही कोकण कन्या सिंधुदुर्गात येत आहे. एस एल देसाई विद्यालय पाट यांच्यातर्फे “सारेगमप लिटिल चॅम्प २०२१” महाविजेती कोकण कन्या गौरी भूषण गोसावी हीचा मंगळवार २५ जानेवारी रोजी १० वा. पाट हायस्कूल रंगमंच येथे गायन कार्यक्रम होणार आहे. यावेळी तिचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांच्या समोर गायन क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवणारे तिचे कोडे उलाडणार आहे. कु. गौरी विद्यालय संस्था तसेच इतर सामाजिक संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा