वेंगुर्ला
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचे औचित्य साधून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद वेंगुर्ला शाखेतर्फे २१ जानेवारी रोजी सागरेश्वर समुद्र किना-यावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
जल, जंगल, जमीन या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी शाश्वत विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सिंधुदूर्ग जिल्हा हा राज्यातील पर्यटन जिल्हा असल्यामुळे देश विदेशातील अनेक पर्यटक सागरेश्वर किना-यावर भेट देत असतात. हा किनारा स्वच्छ असावा ह्या हेतूने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद वेंगुर्ला शाखेतर्फे महिन्यातून दोनवेळा हे स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रदेश सहमंत्री कोमल कुडपकर यांनी दिली.
यावेळी वेंगुर्ला शहरमंत्री अनिकेत बेटगिरी, सहमंत्री यासीर मकानदार, मयुरी भगत, अनिकेत कुंडगिर, मयुरी कासकर, श्रावणी कासकर, अवधूत देवधर, रिद्धी साळगावकर, शिवानी प्रभूखानोलकर, भक्ती साळगावकर, चिन्मयी प्रभूखानोलकर यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.