You are currently viewing पर्यटकाच्या कारची दुचाकीला धडक बसल्याने आंबोलीतील युवक गंभीर

पर्यटकाच्या कारची दुचाकीला धडक बसल्याने आंबोलीतील युवक गंभीर

उपजिल्हा रुग्णालयात दाखल; पळून जाणाऱ्या कार चालकाला स्थानिकांनी पकडले…

सावंतवाडी

भरधाव वेगाने जाणाऱ्या पर्यटकांच्या कारची दुचाकीला समोरून धडक बसल्यामुळे एक युवक गंभीर जखमी झाला आहे. संतोष नवलू पाटील रा. आंबोली, असे त्याचे नाव आहे. हा अपघात आज सायंकाळी साडेतीन वाजण्याच्या सुमारास आंबोली मार्गावर पेडवेवाडी-समर्थ धाबा परिसरात घडला. दरम्यान जखमीला तेथील स्थानिकांनी उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. तर अपघात घडवून पळून जाणाऱ्या कार चालकाला स्थानिक युवक निखिल राठोड याने पाठलाग करून पकडले.

याबाबत अधिक माहिती अशी की, अपघातग्रस्त कार सावंतवाडी येथून कोल्हापूरच्या दिशेने जात होती. तर दुचाकीस्वार कामानिमित्त आंबोली येथून गोव्याच्या दिशेने कामानिमित्त जात होता. यावेळी या दोन्ही गाड्यांची वळणावर एकमेकांना जोरदार धडक झाली. दरम्यान या अपघातानंतर दुचाकीस्वार समोरून येणार्‍या दुसर्‍या डंपरच्या खाली फेकला गेला. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान त्याला स्थानिकांनी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. तर याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 + 7 =