आ. वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजने
आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या आचरा, चिंदर, पळसंब येथील विविध विकास कामांची भूमिपूजने आज आ.वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आली यामध्ये २५/१५ ग्रामविकास योजनेंतर्गत पळसंब येथे श्री. जयंती देवी परिसर सुशोभीकरण निधी ५ लाख, २५/१५ अंतर्गत चिंदर वरची तेरई येथे ब्राम्हणदेव मंदिर सभामंडप बांधणे २.५० लाख , चिंदर खालची तेरई येथे सभामंडप बांधणे २.५० लाख ,आचरा पारवाडी ग्रा. मा. ३४ निधी ९ लाख, आचरा पारवाडी साटमवाडी ते विष्णू मंदिर वायंगणकर आवाट रस्ता निधी ४ लाख २५ हजार, आचरा हिर्लेवाडी वायंगणी रस्ता ९ लाख, २५/१५ अंतर्गत आचरा पिरावाडी ते शंकरवाडी रस्ता निधी ५ लाख हि विकास कामे मंजूर करण्यात आली असून कामांची भूमिपूजने पार पडली. याबद्दल ग्रामस्थांनी आ.वैभव नाईक यांचे आभार मानले.
यावेळी पळसंब येथे शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उप तालुकाप्रमुख बाबा सावंत, आचरा विभागप्रमुख समीर लब्दे, गणेश तोंडवकर, मंगेश गावकर, पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर, दादा गावकर, अनिल पुजारे, मधुकर कदम, पिंट्या सावंत, अविनाश परब
चिंदर येथे अनिल गावकर, समीर हडकर, केदार परुळेकर, जान्हवी घाडी, संजय हडपी, सदाशिव परब, शेखर पालकर, संजू सामंत, सतीश हडकर, मिलिंद चिंदरकर, रावजी तावडे, जगन्नाथ घागरे, सुभाष सावंत, विनोद केळुसकर, मिथुन माळगावकर, सुधीर घागरे, रवींद्र घागरे, बाळकृष्ण घागरे
आचरा येथे उपविभाग प्रमुख जगदीश पांगे, ग्रा. प सद्स्या अनुष्का गावकर, शहरप्रमुख राजू नार्वेकर, माजी सरपंच राजन गावकर, नारायण कुबल, शाम घाडी, भाऊ परब, नित्यानंद कदम, सचिन परब, तारामती कोचरेकर, संगीता सारंग, नितेश सारंग, मंगेश कावले, यशवंत कावले, सक्षम कावले, इंद्रायणी कावले , वैशाली कावले, भगवान धुरी, गीता कुबल, दीपा कुबल, विवेक कुबल, द्वारकानाथ पेडणेकर, रश्मी पेडणेकर, भक्ती जोशी, ऋतुजा जोशी, परेश तारी, पूर्वा तारी , श्रीश तारी, मितेश आडकर, वृषाली आडकर, शिवानी घागरे, शामसुंदर तारी, लवू केळुसकर, वरद केळूसकर, मोहन सारंग, विठ्ठल सारंग, दिलीप पराडकर, वैष्णवी करंजे , चिन्मयी खोबरेकर, पूर्वा कुमठेकर, गौरव कोचरेकर आदी उपस्थित होते.