You are currently viewing तुम्हीच सांगावं

तुम्हीच सांगावं

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ भारती महाजन रायबागकर यांची अप्रतिम काव्यरचना

अशी मी तशी मी
माझं मीच कसं सांगावं
तुम्हीच प्रांजलपणे
नि:संकोच मत मांडावं

स्पष्ट आणि खरंखुरं
दोष मान्य करणार
तेव्हाच तर मी माझ्यात
बदल करू शकणार

…कारण

हसरी मी, म्हटलं तर
म्हणतील उगीच काहीतरी!
बोलकी सांगितली तर
बडबडी कित्ती बाई!

वाचन, लेखन, छंद
केव्हा काम करते?
कामात वेळच मिळेना
स्वतःसाठी कधी जगते?

टचकन डोळ्यात पाणी
रडूबाई सदानकदा!
दुर्लक्षून पुढे चालावं,
बिनधास्त असते सदा!

सगळ्यांची करावी कामं
नको ठेवुस लाडावुन!
पाणी घ्या ना हातानं
आलोय ना मी दमून!

घोड्यावर बसून जाऊ?की…
उतरून पायी चालावं?
आहे तरी कशी मी?
बरंय…इतरांनीच ठरवावं

पण…खुपच छान लिहिता
असं जेव्हा खर्र्खुर्र म्हणतात
सार्थक झालं लिहिण्याचं
गुदगुल्या होतात मनात

भारती महाजन- रायबागकर
चेन्नई
9763204334.

प्रतिक्रिया व्यक्त करा