You are currently viewing रस्त्याच्या दुरवस्थेबाबत स्वागत नाटेकर आक्रमक

रस्त्याच्या दुरवस्थेबाबत स्वागत नाटेकर आक्रमक

सावंतवाडी

इन्सुली- सातजांभळी ते खामदेव नाका रस्त्याच्या दुरावस्थे बाबत इन्सुली ग्रामपंचायत सदस्य स्वागत नाटेकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

मागील 3 वर्षांपासून इन्सुली सातजांभळ ते खामदेव नाका पर्यंतचा रस्ता हा पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. 2020 रोजी आंदोलन केल्यानंतर सुरू झालेले डांबरीकरण आजपर्यंत पूर्ण झालेले नाही. काही ठिकाणी अर्धवट अवस्थेत काम आहे. काही ठिकाणी रस्ता खचून गेलेला आहे. असे असूनही सन दोन वर्षांत या रस्त्याकामी साधारण 2.5 कोटी रुपये खर्च झाल्याचे दिसत आहे. बांदा ते सावंतवाडी हा रस्ता पुर्णतः नादुरुस्त आहे. वारंवार सूचना देऊन सुद्धा हा प्रश्न निकालात न काढल्यामुळे सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर 26 जानेवारी पासून बेमुदत आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा नाटेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंतांना दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा