देवगड :
आध्यात्मिक प्रवचनकार श्री. विश्वनाथ तारकर व त्यांच्या पत्नी सौ. शेवंती विश्वनाथ तारकर रा. तरवाडी जामसंडे ता. देवगड यांचे काळ्या रंगाचे मांजर (काळंबा) अल्पशा आजाराने मृत्यू पावले. पण मालकांनी त्या मुक्या प्राण्यांवर केलेले जिवापाड प्रेम याला कुठेही तोड नाही.
त्यांचे वरील मांजर पातळ, संडास उलटी अश्या लक्षणाने ग्रस्त झाले होते. तेव्हा त्यांनी त्वरित पशुवैद्यकीय दवाखाना देवगड येथे धाव घेतली व त्या मांजरावर मनुष्य पेक्षाही चांगल्या प्रकारे उपचार करून त्या मुक्या प्राण्याविषयी खरे प्रेम व्यक्त केले.
“आज एकीकडे स्वतःच्या जन्मदात्या आई वडिलांवर प्रेम व न सांभाळ करणारे बरेच उदाहरणे बघावयास मिळतात. पण तारकर कुटुंबीय आणि त्या मांजरावर स्वतःच्या पोटच्या मुलाला पेक्षा ही जास्त प्रेम केले आहे. शोकाकुल तारकर कुटुंबीय आपल्या प्रिय मांजराला श्रद्धांजली देण्याच्या माध्यमातून संदेश देतात की “मुक्या प्राण्यांवर प्रेम करा ते आपल्या प्रेमाची परतफेड केल्याशिवाय राहणार नाहीत.”
मनुष्य स्वार्थापोटी प्राणी पाहतात पण मुके प्राणी मात्र आपल्या मालकांवर निस्वार्थी प्रेम करतात. मनुष्यावर केलेले उपकार मनुष्य लगेच विसरतो पण मुके प्राणी कधी ते उपकार विसरत नाही. जीवाला जीव देणारे हे फक्त मुके प्राणीच असतात. आपल्या मालकावर येणारी अनेक संकटे ते आपल्या अंगावर घेत असतात. याची प्रचिती आल्याने स्वतः प्रवचनकार विश्वनाथ तारकर महाराज यांनी स्वतःच्या तपाच्या आसनावर तिला ठेवून स्व वस्त्र मध्ये लपेटून गुलाब पुष्पाच्या गुच्छाने अंतिम संस्कार विधी युक्त दफन केले आहे. “तिच्या आत्म्यास चिरशांती मिळो ही परमेश्वर चरणी मनःपूर्वक प्रार्थना” केली.