इचलकरंजी
इचलकरंजी शहरातील लंगोटे मळा काँर्नर परिसरात शिवशाहीर कै.राजाराम जगताप तैलचित्र व
रस्ता नामकरण उदघाटन असा संयुक्त कार्यक्रम
आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.
यावेळी नगरसेवक सागर चाळके ,माजी उपनगराध्यक्ष बाळासो कलागते ,
मनसे नेते पुंडलिक जाधव,
शाहीर विजय जगताप ,
माजी नगराध्यक्ष राजाराम धारवट, शाहीर चंद्रकांत जगताप ,सुभाष शेळके,मदन जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
वस्त्रनगरीचे सुपूत्र महाराष्ट्र भूषण शिवशाहीर कै.राजाराम जगताप यांनी आपल्या पहाडी,भारदस्त आवाजातून शिवकालीन इतिहासाला जाग आणत समाजात राष्ट्रप्रेमाचे व समाजब्रबोधन करत शाहीरी कलेचा प्रचार व प्रसार करण्यात मोठे योगदान दिले आहे. त्यांनी शाहिरीच्या माध्यमातून इचलकरंजी शहरासह कोल्हापूर जिल्ह्याचे नांव राज्याबरोबरच देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचले आहे. त्यामुळे त्यांचे समाज प्रबोधनाच्या कार्यातील योगदान कायम स्मरणात रहावे या उद्देशाने सामाजिक कार्यकर्ते संजय आरेकर व अशोक कुंभार यांच्या संकल्पनेतून आणि नगरसेवक सागर चाळके यांच्या सहकार्यातून
लंगोटे मळा काँर्नर परिसरात शिवशाहीर कै.राजाराम जगताप
यांचे तैलचित्र उभारण्यात आले आहे.या तैलचित्र व पथ नामकरणाचे उदघाटन आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते व नगरसेवक सागर चाळके यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.
यावेळी आमदार प्रकाश आवाडे ,नगरसेवक सागर चाळके ,पुंडलिक जाधव
यांनी मनोगतात शिवशाहीर कै.राजाराम जगताप यांचे शाहीरी कलेबरोबरच शहराच्या विकासात मोठे योगदान असल्याचे सांगून त्यांचे कार्य चिरंतन राहण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्नशील राहू ,अशी ग्वाही दिली.यावेळी शाहीर विजय जगताप ,शाहीर चंद्रकांत जगताप यांच्यासह अनेक मान्यवरांनी शिवशाहीर कै.राजाराम जगताप यांच्या कार्याचा आढावा घेवून त्यातून समाजासाठी चांगले कार्य करण्याची प्रेरणा मिळत असल्याचे गौरवोद्गार काढले.
यावेळी
माजी उपनगराध्यक्ष बाळासो कलागते, मनसे नेते पुंडलिक जाधव, माजी नगराध्यक्ष राजाराम धारवट , सुभाष शेळके,मदन जाधव, मुकुंद काटे तसेच शिवशाहीर राजाराम जगताप यांच्या परिवारातील सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी संयोजक सामाजिक कार्यकर्ते संजय आरेकर ,अशोक कुंभार ,शुभम आरेकर ,विजय चव्हाण ,उत्तम चौगुले आदींनी अथक परिश्रम घेतले.