You are currently viewing पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करणा-या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा भाजपा सिंधुदुर्ग च्या वतीने जाहीर निषेध !!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करणा-या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा भाजपा सिंधुदुर्ग च्या वतीने जाहीर निषेध !!

प्रसंन्ना ऊर्फ बाळु देसाई , जिल्हा सरचिटणीस , भाजपा – सिंधुदुर्ग

नाना पटोलेंनी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी जी यांच्यावर केलेलं वक्तव्य अत्यंत लांच्छनास्पद आहे. पंतप्रधान पदावर असणाऱ्या व्यक्तिमत्त्वाबाबत अशा प्रकारे गरळ ओकण्याची महाराष्ट्राची संस्कृती मुळीच नाही.

‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ असा कारभार माजवून संपूर्ण देशभरात महाराष्ट्राची बदनामी करण्याचं काम पटोले करत आहेत. देशाच्या पंतप्रधानांवर एका राज्याचा कसलेही कर्तृत्व नसलेला अतिशय सामान्य नेता अशा अश्लाघ्य भाषेत वक्तव्य करतो, तिथेच यांची आणि यांच्या पक्षाच्या संस्कारांची उंची कळते._

मोदीजींचे कर्तृत्व आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला ठेच पोहोचवणे तुमच्या दिल्लीतील पक्षप्रमुखांनाही जमलं नाही, कारण त्यांचे कार्यच तितके महान आहे. त्यांच्या नखाचीही सर नसणाऱ्या तुमच्यासारख्या नेत्याला तरी याची जाणीव असायला हवी. पटोलेंच्या या वक्तव्याचा भाजपा सिंधुदुर्ग निषेध करत आहे .

_आपले संस्कार उघडे पाडणाऱ्या पटोलेंनी मोदी जींची जाहीर माफी मागायलाच हवी. अशी मागणी आम्ही भाजपा – सिंधुदुर्ग च्या वतीने करीत आहोत .

प्रतिक्रिया व्यक्त करा