You are currently viewing जीवन विद्या मिशन – संदर्भ ग्रंथ :- माणसाचा जन्म कशासाठी ?

जीवन विद्या मिशन – संदर्भ ग्रंथ :- माणसाचा जन्म कशासाठी ?

*प्रश्न ३: आपण नास्तिक आहात असे लोक समजतात त्याबद्दल आपण कांही खुलासा कराल का?*

 

*उत्तर : आम्ही नास्तिक तर नाहीच पण पक्के आस्तिक आहोत. मानवी जीवनाचा व वैश्विक जीवनाचा परमेश्वर हा पाया असून तोच कळस आहे, असा जीवनविद्येचा स्पष्ट सिद्धांत आहे. परमेश्वर आहे किंवा नाही हा वाद पुरातन काळापासून आजतागायत चालत आलेला आहे. परंतु जीवनविद्येने हा वाद पूर्ण बाद केलेला आहे.* *जीवनविद्येने परमेश्वराची व्याख्याच खालीलप्रमाणे केलेली आहे. “निसर्गनियमांसहित, स्वयंचलित, स्वयंनियंत्रित,नैसर्गिक, पद्धतशीर व्यवस्था म्हणजेच परमेश्वर.” असा हा परमेश्वर स्थूल रुपात पाहता येतो, सूक्ष्म रुपात ओळखता येतो व दिव्य स्वरुपात त्याला अनुभवता येते.* *अशा या परमेश्वरावर आम्ही नितांत प्रेम करतो. दुसरा मुद्दा असा की, ‘आम्ही नास्तिक आहोत’ अशी काही लोकांची समजूत होण्याची शक्यता आहे, त्याचे प्रमुख कारण असे की, सर्वसामान्य लोक ज्याला परमेश्वर असे मानतात, तो परमेश्वर, आणि आम्ही ज्या परमेश्वराला भजतो तो परमेश्वर, यात खूपच तफावत आहे. परमेश्वर म्हटला की, लोकांच्या डोळ्यासमोर त्यांनी कल्पना केल्याप्रमाणे* *निरनिराळ्या देवांच्या मूर्ती येतात व त्यांना भजणाऱ्या लोकांच्या कल्पना अधिष्ठीत भावनाही विविध प्रकारच्या असतात. परंतु प्रत्यक्षात मात्र परमेश्वर अशा प्रकारचा नसतोच व त्याचा ह्या काल्पनिक भावनांशी कांहीही संबंध नसतो.* *त्याचप्रमाणे परमेश्वराला प्रसन्न करून घेण्यासाठी किंवा त्याचा कोप टाळण्यासाठी सर्वसामान्य लोक जे कर्मकांड करतात, ते आम्हाला मान्य नाही. परमेश्वर म्हणजे मूर्ती नाही, व्यक्ती नाही किंवा नुसती शक्तीही नाही. जीवनविद्येच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे परमेश्वर म्हणजे “शुद्ध जाणीव – शुद्ध नेणीव स्वरूप चैतन्य शक्तीचा विराट सागर (Cosmic life force with Divine intuition)” होय. हा परमेश्वर म्हणजेच विराट चैतन्यशक्ती, ‘पद्धतशीर व्यवस्था’ या स्वरुपात विश्व रुपाने प्रगट होते. परमेश्वर आणि निसर्गनियम एकरूप एकरूप असून विश्वाचे रहाटगाडगे निसर्गनियमाप्रमाणे चालत असते. माणसे जेव्हां विचार-उच्चार-आचार यांच्याद्वारे कर्मे (actions) करतात. तेव्हां ती कर्मे निसर्गाच्या नियमांना गती देतात, त्या गतीतून शुभ किंवा अशुभ नियती निर्माण होते व ती नियती त्यांना सुख-दुःखाच्या रुपाने फळे देत असते. या सर्व प्रकारात परमेश्वर कुठल्याही प्रकारे ढवळाढवळ करीत नाही किंवा हस्तक्षेप करीत नाही. विशिष्ट प्रकारची कर्मकांडे केली म्हणजे परमेश्वराची कृपा होते किंवा त्याचा कोप टाळता येतो, ही, लोकांची समजूत म्हणजे शुद्धभ्रम होय. म्हणून कर्मकांड करण्यात गुंतण्यापेक्षा माणसांनी कर्मचांग करण्यात गुंग व्हावे, असा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. कर्मचांग म्हणजे चांगली कर्मे-सत्कर्मे केल्याने निसर्गनियमांप्रमाणे परमेश्वराकडून उत्तम प्रतिसाद (Reaction) मिळतो व माणसाचे जीवन सुखी होते.*

 

*~ सदगुरु श्री. वामनराव पै.*

💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 4 =