कुडाळ :
सेवानिवृत्त अधिकारी व विद्यालायाचे आश्रय दाते श्री दशरथ म. कोरगावकर व माणगाव विद्यालयाचे प्राचार्य श्री प्रशांत धोंड यांनी विद्यार्थ्यांनची गरज ओळखून रु १ लाख किंमतीचे २८ डेक्स-बेंच विद्यालयाला प्रदान केले.या कार्यक्रमासाठी श्री दशरथ कोरगावकर , श्री प्रशांत धोंड, मांडकुली सरपंच श्री तुषार सामंत, संस्था अध्यक्ष श्री परशुराम नार्वेकर, संस्था सचिव श्री अंकुश जाधव, संस्था उपाध्यक्ष श्री कृष्णा भोई, संस्था सहसचिव श्री निलेश सामंत , श्री प्रसाद धोंड,श्री देवदत्त चुबे, माजी विद्यार्थी संघ सचिव श्री बाबाजी भोई, संस्था संचालक श्री संतोष नार्वेकर, श्री गिरीधर केरवडेकर, श्री वामन गावडे, श्री प्रकाश सावंत, श्री सतीश पडते, मुख्याध्यापक श्री सुरेंद्र खोत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या शुभहस्थे डेक्स बेंच वितरण करण्यात आले.यावेळी संस्थेच्या वतीने श्री दशरथ महादेव कोरगावकर, व श्री प्रशांत धोंड यांचा कृतज्ञता व्यक्त करत शाल, श्रीफळ,व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला तसेच मांडकुली सरपंच व समाजसेवक श्री प्रसाद धोंड यांचाही गावाच्या विकासात केलेल्या योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष स्थनावरून मनोगत व्यक्त करताना श्री कोरगावकर यांनी विद्यार्थ्यांनची गैरसोय दूर करण्यासाठी आपल्या हातून डेक्स -बेंच वितरणाचे कार्य झाले हे मी माझे भाग्य समजतो. श्री प्रशांत धोंड सर यांच्या सारख्या प्राचार्याच्या कार्याने भारावून आपण संस्थेला सहकार्य केले असल्याचे आवर्जुन सांगितले. आपण आपल्या जन्म गावचे ऋण फेडण्यासाठी अशाप्रकारचे कार्य करत आलो व परमेश्वर आपल्या कडून असे कार्य करून घेतो याचे आत्मिक समाधान असल्याचे या प्रसंगी सांगितले संस्थेने आपला मानसन्मान केल्याबदल त्यांनी आभार व्यक्त केले.
माणगाव विद्यालयाचे प्राचार्य श्री प्रशांत धोंड यांनी विद्यालयाच्या विकासात श्री कोरगावकर साहेब यांचे इमारत बांधकाम, शाळाशासन मान्यता या बाबतीत दिलेले योगदान अतुलनीय असल्याचे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घ्यावे, विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी गुणवत्ता वाढीवर भर दयावा,व विद्यार्थी विकासासाठी शिक्षकांनी नवनवीन उपक्रमावर भर दयावा असे सांगितले.यावेळी संस्था अध्यक्ष श्री परशुराम नार्वेकर यांनी श्री कोरगावकर व श्री धोंड यांच्या कार्याचे कौतुक केले व त्यांच्या दातृत्वा बदल ऋण व्यक्त केले. तसेच मागील तीन वर्षांत संस्थेने विद्यालायाच्या गुणवत्ता वाढीसाठी व भौतिक सुविधासाठी केलेली कामे सांगितली व विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात स्वतःला कसे सक्षम बनविले पाहिजे, चांगले आदर्श समोर ठेवले पाहिजे समस्या येत राहतील पण मार्ग काढत पुढे गेले पाहिजे असे सांगितले. यावेळी श्री प्रसाद धोंड यांनी आपल्या मनोगतात संस्थेसाठी ७४ गुंठे जमीन विनामोबदला दिलेल्या श्रीमती सुगंधा पेडणेकर हिच्या दातृत्वाचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री सुरेंद्र खोत यांनी तर आभारप्रदर्शन संस्था सचिव श्री अंकुश जाधव यांनी व सूत्रसंचालन सहायक शिक्षक श्री अनिल गोवेकर यांनी केले.