You are currently viewing राज्यपाल भगतसिंग कोश्यारी उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात…

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात…

सिंधुदुर्गनगरी

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
२७ ऑगस्टला सकाळी १०.१० वा. सिंधुदुर्ग विमानतळ, चिपी येथे आगमन व राखीव. सकाळी १०.१५ वा. सिंधुदुर्ग विमानतळ, चिपी येथून रस्तामार्गे व्ही.व्ही. दळवी महाविद्यालय, तळेरे कडे प्रयाण, सकाळी ११.३५ वा. व्ही.व्ही.दळवी महाविद्यालय, तळेरे येथे आगमन व व्ही. व्ही. दळवी महाविद्यालयाच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती. दुपारी १२.२५ वा. तळेरे येथून वेंगुर्लाकडे प्रयाण. दुपारी २ वा. सौरभ गेस्ट हाऊस, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, वेंगुर्ला येथे आगमन व राखीव. दुपारी ३.०५ वा. सेंटर ऑफ एक्सलन्स इन मरिन स्टडिजच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी ३.३० वा. वेंगुर्ला येथून सिंधुदुर्ग विमानतळ, चिपीकडे प्रयाण. सायं. ४.१० वा. सिंधुदुर्ग विमानतळ चिपी येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण.

प्रतिक्रिया व्यक्त करा