“जनतेचा अनभिषिक्त राजा म्हणजे बॅ.नाथ पै. बुद्धिवंतातील बुध्दिवंत व सामान्यातील असामान्य व्यक्तिमत्व म्हणजे बॅ.नाथ पै होत.” असे उद्गार कमलताई परुळेकर यांनी काढले .त्या कुडाळ येथे बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या वतीने बॅ.नाथ पै पुण्यतिथी व जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय खुल्या गटातील वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या.
त्यांनी आपल्या पुढील मनोगतामध्ये “लोकांचा आवाज होऊन सामान्यजनांची बाजू संसदेत मांडणारे लोकनेते. साधी राहणी उच्च विचार ठेवून कार्य करणारे, शारीरिक व्याधी बाजूला ठेवून लोककल्याणासाठी झटणारे, विरोधकांनाही ज्यांच्या बुद्धीची, अमोघ वाणीची, समाज कळवळ्याची दखल घ्यावी लागली . असे महान व्यक्तिमत्व- बॅ. नाथ पै.यांच्या जीवन कार्यावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित केले याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. अशा उपक्रमातून बॅरिस्टर नाथ पै हे तरुण पिढीला अधिकाधिक समजू शकतील. याबद्दल बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेचे त्यांनी कौतुक केले . विजयी स्पर्धकांना त्यांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर चेअरमन उमेश गाळवणकर, नर्सिंग महाविद्यालयाच्या उपप्राचार्य कल्पना भंडारी, बॅरिस्टर नाथ पै महिला महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण मर्गज, बी.एड कॉलेजचे प्राचार्य परेश धावडे ,बॅरिस्टर नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरज शुक्ला, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य अर्जुन सातोस्कर ,परीक्षक डाॅ.गणेश मर्गज,प्रा नागेश कदम व सौ .गीता पालयेकर उपस्थित होत्या. मान्यवरांच्या शुभहस्ते सरस्वती व नाथ पै यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्ज्वल करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
बॅरिस्टर नाथ पै स्मृती या खुल्या गटातील वक्तृत्व स्पर्धेमध्ये- प्रथम क्रमांक- युक्ता प्रकाश नार्वेकर, द्वितीय क्रमांक -पार्वती धोंडी कोदे, तृतीय क्रमांक- अमित महेश कुंटे तर उत्तेजनार्थ म्हणून- विठ्ठल संजय दळवी,शमिका सचिन चिपकर, यांना गुणानुक्रमे विजयी घोषित करण्यात आले . प्रथम क्रमांकास- रोख रुपये तीन हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र ,द्वितीय क्रमांक- रोख दोन हजार रुपये ,सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांक- रोख रुपये एक हजार व सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रुपये पाचशे -पाचशे ची दोन उत्तेजनार्थ पारितोषिकं असलेल्या या स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना १८जानेवारी २०२२ रोजी बॅ.नाथ पै पुण्यतिथी व संस्था स्थापणेच्या कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये एकूण वीस स्पर्धकांनी भाग घेतला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.रूचा कशाळीकर ,प्रास्ताविक अरुण मर्गज, तर उपस्थितांचे आभार प्रा.नितीन बांबर्डेकर यांनी मानले. स्पर्धा यशस्वितेसाठी उमेश गाळवणकर ,अरुण मर्गज, परेश धावडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसाद कानडे,प्रा. प्रथमेश हरमलकर ,किरण सावंत, पांडुरंग पाटकर ,सुनील गोसावी , विशाल सांवंत, संतोष पडते, गजानन टारपे इ.नी विशेष सहकार्य केले.