You are currently viewing महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2022

महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2022

महाराष्ट्र राज्याला 61 वर्षं पूर्ण झाल्याचे औचित्य साधून महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचा मुबई तरुण भारत , अक्षरभारती सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान मुबंई ( ठाणे ) तसेच अक्षरमंच प्रकाशन या संस्थेने आयोजित केलेल्या समारंभाच्या नियोजनाचे आयोजक श्री. संपादक किरण शेलार , तसेच अध्यक्ष डॉ. योगेश जोशी व हेमंत नेहते या समिती तर्फे महाराष्ट्रातील साहित्य , कला , संस्कृती , शैक्षणिक , औद्योगिक , व्यावसायिक क्षेत्रातील उत्तुंग अशा व्यक्तींचा *महाराष्ट्र गौरव* पुरस्कार देवून सत्कार करण्यात आला.

या समारंभात पुण्यातील ज्येष्ठ साहित्यिक , भावकवी , संपादक , व्याख्याते , संतचित्रकार , मुद्रक व प्रकाशक तसेच महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे , मुंबई , ठाणे ( महाराष्ट्र ) यांचे संस्थापक अध्यक्ष असलेल्या मा. वि.ग.सातपुते यांचा *ठाणे येथील *काशीनाथ घाणेकर नाट्यगृह मानपाडा ठाणे ( मुंबई )*

या सभागृहात सन्मानपत्र , शाल , श्रीफल , व सन्मानचिन्ह देवून यथोचित *महाराष्ट गौरव* हा मोलाचा भूषणास्पद सन्मान करण्यात आला. आणी त्या निमित्ताने *तरुण भारत या वृत्तपत्राने *महाराष्ट्र गौरव पुरकार 2022* ही यथोचित अशी समग्र स्मरणीका प्रसिध्द केली आहे. या प्रसंगी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती..

प्रतिक्रिया व्यक्त करा