कणकवली :
कणकवली नगरपंचायत मुख्याधिकारी अवधुत तावडे यांचा कोविड तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून तावडे यांनी रॅपिड टेस्ट केली होती. ती निगेटिव्ह आली होती. मात्र, त्यानंतर त्यांनी कोविडची आरटीपीसीआर स्वॅॅब तपासणी केली होती. त्यांची ही स्वॅब तपासणी पॉझिटिव्ह आल्याने गेल्या चार दिवसात आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोविड स्वॅब तपासणी करून घ्यावी असे आवाहन तावडे यांनी केले आहे.